PM Modi US Visit : PM मोदी लवकरच अमेरिका अन् इजिप्तच्या दौऱ्यावर; 'असे' असेल संपूर्ण वेळापत्रक

PM Narendra Modi will visit USA and Egypt from 20 to 25 June mea shares Complete schedule
PM Narendra Modi will visit USA and Egypt from 20 to 25 June mea shares Complete schedule
Updated on

पंतप्रदान नरेंद्र मोदी हे २० जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. या दौऱ्यात ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांची भेट घेणार आहेत. राष्ट्राध्यक्ष बिडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत.

अमेरिकेनंतर पंतप्रधान मोदी इजिप्तलाही जाणार आहेत. ते २० ते २५ जून या कालावधीत अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावर असतील. यादरम्यान पंतप्रधान मोदी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा देखील होऊ शकते. पीएम मोदींच्या या भेटीबाबत परराष्ट्र मंत्रालयाने माहिती दिली आहे.

पीएम मोदींचे वेळापत्रक कसे असेल?

पंतप्रधान मोदी २१ जून रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र मुख्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. यानंतर, २२ जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत केले जाईल आणि पंतप्रधान मोदींच्या सन्मानार्थ स्टेट डिनरचे आयोजन केले जाईल. यानंतर, पंतप्रधान २३ जून रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात भारतीय समुदायाच्या नागरिकांना संबोधित देखील करतील, ज्यासाठी तयारी केली जात आहे.

PM Narendra Modi will visit USA and Egypt from 20 to 25 June mea shares Complete schedule
Indurikar Maharaj : 'ते' वक्तव्य इंदुरीकर महाराजांना भोवलं! औरंगाबाद खंडपीठाचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी २२ जून रोजी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे अध्यक्ष केविन मॅककार्थी आणि सिनेटचे अध्यक्ष चार्ल्स शुमर यांच्यासह अनेक खासदारांच्या निमंत्रणावरून अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. एका दिवसानंतर, २३ जून रोजी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन मोदींच्या सन्मानार्थ स्नेहभोजनाचे आयोजन करतील.

PM Narendra Modi will visit USA and Egypt from 20 to 25 June mea shares Complete schedule
Ajit Pawar : सरकार टिकवण्यााठी ते ४० आमदार… ; अजित पवारांचे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून गंभीर आरोप

मोदींचा पहिला इजिप्त दौरा

अधिकृत बैठकींव्यतिरिक्त ते अनेक मोठ्या कंपन्यांच्या सीईओ आणि इतर अधिकाऱ्यांशीही चर्चा करणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान मोदी २४ ते २५ जून दरम्यान इजिप्तच्या राजकीय दौऱ्यानिमीत्त कैरोला भेट देणार आहेत.

इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फतह अल-सिसी यांच्या निमंत्रणावरून मोदी हा दौरा करत आहेत. अल-सिसी यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती आणि त्याच वेळी पंतप्रधानांना इजिप्तला भेट देण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधान म्हणून मोदींचा हा पहिलाच इजिप्त दौरा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.