PM मोदी म्हणतात, NDA काळाच्या ओघातही टिकून; अनेक पक्ष देशाला माहिती नाहीत, काँग्रेसची टीका

देशातील राजकारणाच्या दृष्टीनं आज दिल्ली आणि बंगळुरु इथं दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या.
Narendra Modi and Mallikarjun Kharge
Narendra Modi and Mallikarjun Kharge
Updated on

नवी दिल्ली : देशातील राजकारणाच्या दृष्टीनं आज दोन महत्वाच्या बैठका पार पडल्या. यातील एक भाजप्रणित एनडीएची बैठक दिल्लीत पार पडली तर काँग्रेसप्रणित विरोधीपक्षांची बैठक बंगळुरु इथं पार पडली. एनडीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी एक ट्विटही केलं.

या ट्विटमध्ये त्यांनी एनडीएला काळाच्या ओघातही टिकून राहिलेली युती म्हटलं आहे. तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी एनडीएच्या बैठकीत ३८ पक्ष सहभागी असल्याच्या मोदींच्या दाव्यावर टीका केली आहे. यातील अनेक पक्ष देशाला माहितीही नाहीत, असं त्यांनी म्हटलं आहे. (PM says NDA time tested alliance Opposition digs says never heard party names)

मोदींनी काय केलंय ट्विट?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं की, हा खूपच आनंदाचा क्षण आहे की, देशभरातील आमचे मुल्यवान एनडीएचे सहकारी आजच्या दिल्लीतील बैठकीला हजेरी लावणार आहेत. आमची ही युती काळाच्या ओघातही टिकून राहिलेली युती आहे. जी राष्ट्राची प्रगती आणि राज्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार आहे. (Latest Marathi News)

Narendra Modi and Mallikarjun Kharge
Opposition Meet: 'इंडिया'च्या कल्पनेवर आक्रमण होत आहे, त्याविरोधात आमची लढाई - राहुल गांधी

काँग्रेसनं मोदींच्या दाव्याची उडवली खिल्ली

दरम्यान, सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरु येथील विरोधकांच्या बैठकीवर सडकून टीका केली होती. विरोधकांसोबत २६ पक्ष असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्यानंतर विरोधकांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर देताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांची खिल्ली उडवली. (Marathi Tajya Batmya)

पंतप्रधानांना गेल्या ९ वर्षात आपल्या सहकाऱ्यांची आठवण झाली नाही आणि आता ते आमच्यासोबत ३० पक्ष असल्याचं सांगत आहेत. यातील कितीतरी पक्ष देशाला माहितीच नाहीत, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली.

विरोधकांची नवी आघाडी

विरोधकांची बंगळुरुमधील बैठक यशस्वी ठरली. या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांना अंतिम स्वरुप देण्यात आलं. यामध्ये नव्या आघाडीची घोषणा करण्यात आली. ज्याला भारतीय राष्ट्रीय विकासवादी सर्वसमावेशक आघाडी (इंडिया) असं नाव देण्यात आलं आहे. तसेच या इंडियाच्या ११ संयोजकांची नावं पुढील मुंबईतील भेटीत निश्चित केली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.