PM Shadi Shagun Yojana: सरकारकडून मुलींना मिळतील ५१ हजार रूपये, जाणून घ्या योजना

अल्पसंख्याक समाजातील मुलींमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी ही योजना आहे
PM Shadi Shagun Yojana
PM Shadi Shagun Yojana
Updated on

केंद्र सरकारने देशातल्या अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या सुरक्षा, पोषण आणि उच्च शिक्षणासाठी योजना तयार केली आहे. या योजनेत 'प्रधानमंत्री शादी शगुन योजना'चाही समावेश आहे. शादी शगुन योजना (ssy) देशातील अल्पसंख्याक समाजातील मुलींमध्ये उच्च शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी या योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लग्नाआधी पदवी पूर्ण केलेल्या अल्पसंख्यांक समाजातील मुलींना सरकार ५१ हजार रूपये देते.

PM Shadi Shagun Yojana
लग्न करेन तर युक्रेनच्या मुलीशीच! चिनी पुरुषांचा निर्णय

अशी आहे योजना (PM Shadi Shagun Yojana)

मौलाना आझाद एज्युकेशन फाऊंडेशन या केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या संस्थेने मुस्लिम समाजातील मुलींमध्ये उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली होती. अल्पसंख्याक मंत्रालयाने ठराव मंजूर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ ऑगस्ट २०१७ रोजी शादी शगुन योजना सुरू केली. देशातील अल्पसंख्याक समाजामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. अल्पसंख्यांक समुदायातील विशेषत: मुस्लिम समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाची स्थिती फारशी चांगली नाही. यावर उपाय म्हणून योजनेची सुरूवात करण्यात आली.

PM Shadi Shagun Yojana
मुलींनो, लग्नानंतर नातं, करिअरचा समतोल कसा साधाल? चार गोष्टी युक्तीच्या

यांनाही मिळतो लाभ

मुस्लिम समाजातील ज्या मुलींनी शालेय स्तरावर बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (https://scholarship-maef.org/) मिळवली आहे, त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. बेगत हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती मुस्लिम, ख्रिश्चन, शीख बौद्ध, जैन, पारशी समुदायातील मुलींना दिली जाते. केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाकडून तुम्ही शादी शगुन योजनेची सविस्तर माहिती मिळवू शकता. SSY योजनेबद्दल अधिक माहिती तुम्हाला https://www.india.gov.in/schemes-maulana-azad-education-foundation या लिंकवर मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.