PM Surya Ghar Scheme : तुम्हालाही दरमहिन्याला 300 युनिट मोफत वीज पाहिजे? तर करा 'ही' तीन कामं...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी ३०० युनिट मोफत वीज देण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. 'पीएम सूर्य घरः मोफत वीज योजना' ही ती योजना असून यासाठी केंद्र सरकार ७५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार हे. यातूनच लाभार्थी कुटुंबाला तीनशे युनिट मोफत वीज मिळणार आहे.
PM Surya Ghar Scheme
PM Surya Ghar Schemeesakal
Updated on

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी ३०० युनिट मोफत वीज देण्यासाठी एक योजना जाहीर केली आहे. 'पीएम सूर्य घरः मोफत वीज योजना' ही ती योजना असून यासाठी केंद्र सरकार ७५ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार हे. यातूनच लाभार्थी कुटुंबाला तीनशे युनिट मोफत वीज मिळणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तीन गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्यानंतर सूर्य घर योजनेला पात्र ठरता येईल. मोफत वीजेसोबतच केंद्र सरकार लाभार्थ्यांना अनुदान देणार आहे. अप्लाय करण्यासाठी http://pmsuryaghar.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

त्यापूर्वी, तुमच्याकडे १३० स्क्वेअर फुट एरियाचं छत लागणार आहे. तुमचा फ्लॅट असेल किंवा तुम्ही रेंटवर राहात असाल तरी योजनेचा लाभ घेता येईल.

PM Surya Ghar Scheme
Sonia Gandhi Property : 88 किलो चांदी, सव्वा किलो सोनं...इटलीत देखील प्रॉपर्टी! सोनिया गांधींची संपत्ती ५ वर्षात किती वाढली ?

दुसरं, छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पहिल्यांदा ४७ हजार खर्च होतील, त्यानंतर त्यावर १८ हजार रुपयांचं अनुदान मिळेल. तिसरं महत्त्वाचं म्हणजे, योजनेसाठी अर्ज करतेवेळी तुम्हाला सध्याचा वीजेचा वापर आणि इतर माहिती सोबत द्यावी लागेल. या तीन बाबींचा फॉलो केल्यास योजनेचा लाभ घेता येणार आहे.

कोणाला मिळेल लाभ?

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. केंद्राने एक कोटी घरांच्या छतांवर या योजनेंतर्गत सोलर पॅनल बसवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सरकारने सबसिडी वाढवली, त्याचं कारण जास्तीत जास्त लोक कर्जाशिवाय या योजनेचा लाभ घेतील. ज्यांच्या घराचं वीजबिल ३०० युनिटपेक्षा कमी आहे, अशांसाठी ही योजना लाभदायी ठरणार असून सरकारही या लाभार्थ्यांना लाभ देणार आहे.

PM Surya Ghar Scheme
Salman Khan : सलमानच्या 'बजरंगी भाईजान'च्या सह निर्मात्यावर संकट, बंगळुरुमधील मॉलला लावले टाळे! काय आहे कारण?

केंद्र सरकारनेदेशात सौर ऊर्जेच्या माध्यमातून १०० गिगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये सौर ऊर्जेच्या माध्यमातून जवळपास ३५ गिगावॅट वीजेची निर्मिती होत आहे. चालू आर्थिक वर्षात ७३ गिगावॅटपर्यंत वीज निर्मिती होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.