PM Vishwakarma Scheme: ...अन् त्यांनी PM मोदींवरही टाकलं प्रेमाचं जाळं; पुरस्कार स्वीकारताच पंतप्रधानांना मारली मिठी

मासेमारीची जाळी बनवणाऱ्या व्यक्तीचा पंतप्रधान मोदींनी केला सन्मान
PM Vishwakarma Scheme
PM Vishwakarma SchemeEsakal
Updated on

देशातील सुतार, कुंभार, धोबी, मूर्तिकार, शिल्पकार यासह अनेक कारागिरांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशातील ३० लाख कारागिरांचे नशीब पीएम विश्वकर्मा योजनेमुळे बदलेल. केंद्रीय मंत्रिमंडळाने नवीन विश्वकर्मा योजनेला मंजुरी दिली आहे. १३ हजार कोटी रुपयांच्या या योजनेचा फायदा देशातील ३० लाख पारंपरिक कारागिरांना होईल. त्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. त्यावरील कमाल व्याज पाच टक्के असेल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात दोन लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार आहे.

ही योजना १३ हजार कोटी रुपयांची आहे. लहान शहरांमध्ये गुरू-शिष्य परंपरेनुसार कौशल्यासंबंधीच्या कामात विविध वर्ग गुंतले आहेत. यात सुतार, लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलकाम करणारे, मासे पकडायचे जाळे विणणारे, कुलपे तयार करणारे, शिल्पकार आदींचा समावेश होतो. या योजनेद्वारे त्यांना पतपुरवठ्याची सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता मदत केली जाणार आहे. दरम्यान काल पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात कुशल कारागिरांचा सन्मान करण्यात आला.

PM Vishwakarma Scheme
PM Vishwakarma Yojana : 12 बलुतेदारांना कमी दराने व्यावसायिक कर्ज; जाणून घ्या सविस्तर

विश्वकर्मा जयंतीनिमित्त काल (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'पीएम विश्वकर्मा' नावाची नवीन योजना सुरू करण्यात आली.

यावेळी तामिळनाडूतील मासेमारीसाठी जाळे विणणारे तामिळनाडूचे के. पलानिवेल यांचाही सन्मान पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आला. हा सन्मान के. पलानिवेल यांच्यासाठी भावनिक क्षण ठरला आहे. विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमात कुशल कारागिराचा सन्मान स्वीकारण्यासाठी के. पलानिवेल मंचावर आले. त्यांनी सन्मान स्वीकारला आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिठी मारली. याचा व्हिडीओ सोशल मिडीयावरही चांगलाच व्हायरल झाला आहे.

PM Vishwakarma Scheme
Vishwakarma Jayanti: पंतप्रधान मोदी यांच्याकडून विश्वकर्मा योजनेचे लोकार्पण; पारंपरिक कारागिरांना मिळणार लाभ

विश्वकर्मा योजनाचा फायदा

- पीएम विश्वकर्मा योजनेच्या पहिल्या टप्प्यात १८ पारंपरिक उद्योगांचा समावेश

- पारंपरिक कारागीर आणि कारागिरांच्या ३० लाख कुटुंबास होणार फायदा

- योजनेंतर्गत मूलभूत आणि आधुनिक असे दोन प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देणार

- आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी सरकार १५ हजार रुपयांची मदत करणार

- ब्रॅंडिंग, ऑनलाइन मार्केट अॅक्सेस यासारखी मदत केंद्राकडून दिली जाणार

- प्रशिक्षणादरम्यान दररोज ५०० रुपये मानधनही दिले जाईल

- किमान प्रशिक्षण सहा ते पंधरा दिवस असणार

विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन देशभरातील कारागीर व कारागिरांच्या क्षमता वाढविणे हा आहे. या योजनेंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांशी जोडले जाणार आहे. त्यामुळे त्यांना खात्रीची आणि मोठी बाजारपेठ मिळू शकेल.

PM Vishwakarma Scheme
PM विश्वकर्मा योजनेचे फायदे! कौशल्य प्रशिक्षणासोबत मिळेल 3 लाख रुपयांचे कर्ज, 18 व्यवसायांचा समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.