प्रधानमंत्री आवास योजनेची ३१ मार्चला संपणार मुदत, केंद्रीय मंत्र्यांची माहिती

PMAY End 31 March 2022
PMAY End 31 March 2022e sakal
Updated on

नवी दिल्ली : प्रधानमंत्री आवाज योजनेच्या (शहरी) (PMAY) माध्यमातून स्वस्त दरात घरं उपलब्ध करून दिले जात होते. आतापर्यंत राज्यांनी केलेल्या मागणीच्या आधारे या योजनेअंतर्गत १.१५ कोटी घरांना मंजुरी दिली आहे. पण आता ही योजना मार्च २०२२ मध्ये (PMAY End 31 March 2022) संपेल, असं केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी (Hardeep Singh Puri) म्हणाले. ते लोकसभेत बोलत होते.

PMAY End 31 March 2022
PMAY-U अंतर्गत 75 हजार लाभार्थ्यांना घरे; PM मोदींनी सोपवली किल्ली

प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) ची संकल्पना जून 2015 मध्ये अंमलात आणली. आतापर्यंत घरांच्या मागणीने एक कोटीचा प्रारंभिक अंदाज ओलांडला आहे. सध्या घरांची संख्या १.१५ कोटी आहे आणि चालू आर्थिक वर्षांच्या तीन दिवसांत ही संख्या आणखी वाढेल. मार्च २०२२ पर्यंत प्रत्येक भारतीयांकडे पक्के घर आणि शौचालय असावे. तसेच या घरावर महिलेचे नाव असावे, असं पंतप्रधान मोदींचं स्वप्न होतं असं हरदीप पुरी म्हणाले. तसेच क्रेडिट-लिंक्ड सबसिडी योजना 31 मार्च 2022 नंतर सुरू ठेवण्याचा विचार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

या योजनेअंतर्गत सर्व राज्यांना जून 2015 पर्यंत केंद्राकडे मागणीचे मूल्यांकन देण्यास सांगितले होते. त्याआधारे एक कोटी घरे बांधली जाणार होती. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना-शहरीचे उद्दिष्ट पूर्ण झाले. आता खासगी क्षेत्रात परवडणारी घरे बांधली जात आहेत. काही राज्ये आम्हाला आणखी मागण्या पाठवत आहेत. यामुळे पंतप्रधानांचे PMAY-U शी संबंधित स्वप्न पूर्ण होणार आहे, असं पुरी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.