CBI ची इजिप्तमध्ये मोठी कारवाई! निरव मोदीच्या निकटवर्तीयाला आणलं भारतात

CBI  Brought Nirav Modi Closed Aid Mumbai
CBI Brought Nirav Modi Closed Aid Mumbai e sakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने PNB घोटाळ्यातील (PNB Scam) आरोपी नीरव मोदीचा (Nirav Modi) जवळचा सहकारी सुभाष शंकर परब याला इजिप्तची राजधानी कैरो येथून मुंबईत आणले आहे. त्याला विशेष विमानाने आणण्यात आले आहे. त्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. सुभाष शंकर हा पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटींहून अधिकच्या घोटाळ्यातील आरोपी आहे.

CBI  Brought Nirav Modi Closed Aid Mumbai
नीरव मोदींच्या मालमत्तेचा ताबा घेण्याची परवानगी मिळाली; PNB बॅंकेला दिलासा

49 वर्षीय सुभाष शंकर परब हा नीरव मोदीचा सर्वात जवळचा सहकारी असून 2018 मध्ये नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीसह भारतातून पळून गेला. त्याला कैरोहून मुंबईत आणल्यानंतर सीबीआयने त्याला अटक केली आहे. मुंबई न्यायालयात हजर केल्यानंतर सीबीआय आता त्याला ताब्यात घेईल आणि पीएनबी घोटाळ्यात त्याची चौकशी करणार आहे. दुपारी बाराच्या सुमारास सुभाषला मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांच्यावर सार्वजनिक क्षेत्रातील बँक PNB कडून कर्ज सुविधा मिळवून 14,000 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे लोक देश सोडून पळून जाण्यात यशस्वी झाले होते. सुभाष शंकर हा नीरव मोदीच्या कंपनीचा डीजीएम होता. सीबीआयने नीरव मोदीवर पुराव्यांशी आणि साक्षीदारांशी छेडछाड केल्याचा आणि काही कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना कैरोला नेल्याचा आरोपही केला होता. सीबीआयने सुभाष शंकर यांच्यासह नीरव मोदी, निशाल मोदी यांच्यावर यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.