नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेकडून (PNB) 13,000 कोटी रुपयांच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सी (Mehul Choksi), त्याची पत्नी प्रीती आणि इतरांविरुद्ध मनी लाँडरिंग (Money Laundering) प्रतिबंधक कायद्यांतर्गत नवीन आरोपपत्र दाखल केले आहे. अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली. (Mehul Choksi News)
चोक्सीची पत्नी प्रीती प्रद्योत कुमार कोठारी विरुद्ध ईडीने दाखल केलेले हे पहिलेच आरोपपत्र असून, ईडीने चोक्सीच्या पत्नी प्रीती यांच्या विरोधात गुन्ह्याची रक्कम लपवण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (PMALA) फौजदारी कलमांतर्गत दाखल केलेले आरोपपत्र मार्चमध्ये मुंबईतील विशेष न्यायालयासमोर ठेवण्यात आले होते आणि न्यायालयाने सोमवारी त्याची दखल घेतली.
चोक्सी दाम्पत्याव्यतिरिक्त एजन्सीने चोक्सीच्या गीतांजली जेम्स लिमिटेड, गिली इंडिया लिमिटेड आणि नक्षत्र ब्रँड लिमिटेड आणि पंजाब नॅशनल बँकेचे सेवानिवृत्त उपव्यवस्थापक (ब्रॅडी हाऊस शाखा, मुंबई) गोकुलनाथ शेट्टी यांचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे. यापूर्वी ईडीने 2018 आणि 2020 मध्ये चोक्सी विरोधात दोन आरोपपत्र दाखल केले असून, आज दाखल करण्यात आलेले हे चोक्सीविरुद्धचे तिसरे आरोपपत्र आहे.
ईडीकडून चोक्सीच्या मालमत्तेवर टाच
ईडीने मेहुल चोक्सीच्या मालमत्तांवर याआधीच टाच आणली असून, या अंतर्गत चोक्सीची तब्बल 1217 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यामध्ये मुंबईतल्या 41 मालमत्तांचा समावेश आहे. यात 15 आलिशान फ्लॅट आणि 17 कार्यालयांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबादमधील ऑफिस, कोलकात्यातला शॉपिंग मॉल, अलिबामधील फार्म हाऊस आणि 231 एकर जमीनीचा समावेश आहे. याशिवाय, ईडीने मेहुल चोक्सीचे 72 कोटी 80 लाख रुपयांचे शेअर्सदेखील गोठवले आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.