कोलकाता : मुलींनी आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवावं, असा सल्ला कोलकाता हायकोर्टानं दिला आहे. एका लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महत्वाची सुनावणी करताना हायकोर्टानं मुला-मुलींना हे आवाहन केलं आहे.
या प्रकरणात एका २० वर्षीय तरुणाला त्यानं आपल्या अल्पवयीन प्रेयसीसोबत शाररीक संबंध ठेवल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं पॉक्सो कायद्यांतर्गत २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या तरुणानं या शिक्षेविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. (Pocso Act Calcutta High Court Said Girls Should Control Sexual Urges Avoid Two Minute Pleasure)
हायकोर्टात मुलीनं सांगितलं की, आम्हा दोघांमध्ये परस्पर सहमतीनं शाररिक संबंध आले होते तसेच आम्ही दोघं लग्न करु इच्छित होतो. पण भारतात शाररिक संबंध प्रस्थापत करण्यासाठीचं वय हे १८ वर्षे असल्यानं आमच्याबाबत हा गुन्हा ठरवला गेला. (Latest Marathi News)
यावर न्या. चितरंजन दास आणि न्या. पार्थ सारथी सेन यांच्या खंडपीठानं तरुणांना काही सल्लेही दिले. तसेच शाळांमध्ये तरुणांना लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचंही अधोरेखित केलं.
खंडपीठानं तरुणांना अपील करताना म्हटलं की, मुलींनी आपल्या लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे, त्यांनी दोन मिनिटांच्या लैंगिक सुखाच्या जाळ्यात अडकू नये. खंडपीठानं आपल्या निकालात म्हटलं की, लैंगिक इच्छांवर नियंत्रण ठेवा कारण या दोन मिनिटांच्या लैंगिक सुखासाठी मुली समाजाच्या नजरेत दोषी ठरतात. त्यामुळं ही तरुण मुलींची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या शरिराचं अखंडत्व, सन्मान टिकवून ठेवायला हवा. (Marathi Tajya Batmya)
तसेच मुलांनी मुलींचा सन्मान राखला पाहिजे. यासाठी त्यांच्या मेंदूला अशा प्रकारे प्रशिक्षित करायला हवं की, त्यांनी महिलांचा सन्मान राखला पाहिजे, अशी महत्वाची टिप्पणीही हायकोर्टानं यावेळी केली.
हायकोर्टानं अपील करणाऱ्या तरुणाला दिलासा दिला तसेच हे देखील मान्य केलं की, पॉक्सो कायदा अल्पवयीन मुलीसोबत सहमती किंवा असहमतीनं संबंध प्रस्थापित करण्यासाठी जबाबदार ठरु शकत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.