Amit Shah: पश्चिम बंगालमधील हुगळीत गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी पीओके बद्दल देखील भूमिका मांडली. पूर्वी काश्मीरमध्ये स्वातंत्र्याचे नारे लागले, आज पीओकेमध्ये स्वातंत्र्याचे नारे लावले जात असल्याचे शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले, "पूर्वी इथे दगडफेक व्हायची, आज तिथे दगडफेक होत आहे. 2 कोटी 11 लाख पर्यटकांनी काश्मीरमध्ये जाऊन नवा विक्रम रचला आणि पीओके मधील पिठाच्या किमतीने विक्रम केला. हे मणिशंकर अय्यर, हे फारुख अब्दुल्ला देशाला घाबरवण्याचे काम करतात, पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि पीओकेबद्दल बोलत नाही. राहुल बाबा तुम्हाला घाबरायचे असेल तर घाबरा, ममतादीदी तुम्हाला घाबरायचे असेल तर घाबरा, पीओके भारताचे आहे आणि आम्ही ते परत घेऊ."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक गरीबाला 5 किलो तांदूळ मोफत पाठवले आहेत. ममतादीदी चाली खेळत आहे. मोदी तांदूळ पाठवत आहेत पण ममतादीदी वरती त्यांचा फोटो चिकटवतात. ममता दीदी, फोटो पेस्ट करण्याऐवजी मोदीजी पाठवत असलेल्या ५ किलोपेक्षा २ किलो जास्त द्या, असे शाह म्हणाले. तसेच पंतप्रधान मोदींनी गरिबांसाठी पाठवलेला तांदूळ ममतांच्या सिंडिकेटने बाजारात विकला, असा आरोप देखील अमित शाह यांनी केला.
पश्चिम बंगालच्या श्रीरामपूरमध्ये अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आणि म्हणाले की, व्होट बँकेसाठी पश्चिम बंगालचा विश्वासघात करणाऱ्या ममता दीदींना पराभूत करण्याचे जनतेने मन बनवले असल्याचे देखील अमित शाह म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.