पाटणा - पाटण्यामध्ये आज बळीराजाच्या आंदोलनाचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किसान महासभा आणि डाव्या संघटनांनी तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना सोबत घेऊन महामोर्चा काढण्याचे नियोजन आखले होते.
गांधी मैदानापासून राजभवनाच्या दिशेने काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांना डाक बंगला परिसरामध्ये रोखून धरले होते. राजभवन येथून ४ किलोमीटर अंतरावर आहे. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी उभारलेले बॅरिकेड तोडून राजभवनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. राजभवनाच्या दिशेने जाणारा मार्च रोखणे हा देखील एक प्रकारचा अन्यायच आहे. आम्हाला राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्यायचे होते, असे अखिल भारतीय किसान महासभेचे बिहारचे सचिव रामाधार सिंह यांनी सांगितले.
येथील शेतकऱ्यांचा समावेश
आजच्या मोर्चामध्ये पूर्णिया, अररिया, सीमांचलमधील काही जिल्हे, चंपारण्य, सिवान आणि गोपालगंज येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. हे सगळे शेतकरी सोमवारीच पाटण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.