बोधगया येथील कालचक्र मैदानाजवळून गुरुवारी संध्याकाळी मिस सॉंग शिओलान या चिनी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेने बौद्ध भिक्खूचा पेहराव केला होता. ती 2020 पासून बोधगयामध्ये असल्याचे सांगितले जात आहे. मधल्या काळात ती नेपाळलाही गेली. ती चीनमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करत होती. या महिलेला पकडल्यानंतर पोलिस महिलेची बोधगया पोलीस ठाण्यात चौकशी करत आहेत.
गया शहराचे एसपी अशोक प्रसाद यांनी सांगितले की, चिनी महिलेला बोधगया येथील गेस्ट हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना बोधगया पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. 2020 पासून ती भारतात राहत होती.
महिलेकडे 2024 पर्यंत व्हिसा आहे. प्रथमदर्शनी, कोणत्याही हेरगिरीचे प्रकरण अद्याप समोर आलेले नाही. चौकशी केली जात आहे. महिलेचे वय 50 वर्षे असल्याचे सांगण्यात आले.
जेएस गंगवार, एडीजी (मुख्यालय) यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला याबद्दल माहिती देताना सांगितले की, तिबेटचे अध्यात्मिक नेते दलाई लामा यांना कथित धोका निर्माण केल्या प्रकरणी बिहार पोलिसांनी बोधगया येथील संशयित (चिनी) महिलेला ताब्यात घेतले आहे. महिलेची चौकशी करण्यात येत आहे.
कालचक्र मैदानावर आजपासून दलाई लामा यांचे तीन दिवसीय प्रवचन सुरू झाले आणि येथूनच चिनी महिलेलाही अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी या महिलेची माहिती पोलिसांना मिळताच पहिले रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले. तत्काळ पोलिसांचे पथक तयार करून महिलेचा शोध सुरू करण्यात आला. सायंकाळी उशिरा या महिलेला कालचक्र मैदानाजवळ पकडण्यात आले.
दलाई लामा हे एक महिन्याच्या मुक्कामावर आहेत. तो बोधगयामध्येच राहणार आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला 50 हून अधिक देशांतील सुमारे दोन लाख बौद्ध भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या महिलेबाबत ती दलाई लामा यांची हेरगिरी करत असल्याचे उघड झाले आहे.
प्रवचन कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी सकाळी ही बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली. या माहितीनंतर पोलीस मुख्यालयाकडून अलर्टही जारी करण्यात आला. या महिलेला पकडल्यानंतर पोलिसांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.