Himachal Pradesh Accident: पोलिसांची जीप नदीत पडली; 6 जवानांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी

himachal
himachalesakal
Updated on

नवी दिल्ली- हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून अनेक अपघात घडत आहेत. असाच एक दुर्दैवी प्रकार समोर आला असून चंबा जिल्ह्याच्या तीसा भागात पोलिसांची एक बोलेरो जीप नदीमध्ये पडली. माहितीनुसार, यात सहा जवानांचा मृत्यू झाला असून चार पोलिस गंभीर जखमी झालेत. पोलिसांनी भरलेले वाहन अनियंत्रित झाले आणि सियोल नदीत जाऊन पडले अशी माहिती देण्यात आली आहे. लाईव्ह हिंदूस्थानने यासंदर्भातील वृत्त दिलंय.(police jeep fail in river six dead four injured himachal pradesh chanba district)

चंबाचे एसपी अभिषेक यादव यांनी सांगितलं की, शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात सहा पोलिसांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चालक आणि पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. चार पोलिस जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच एक पोलिस कर्मचारी नदीमध्ये वाहून गेला असून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिस आणि एनडीआरएफची टीम वाहून गेलेल्या जवानाचा शोध घेत आहेत.

himachal
Adhir Ranjan Chowdhury: नीरव मोदी म्हणजे शांत मोदी! काँग्रेसचा संसदेत बचाव

हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ल आणि मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या आत्म्यांना शांती लाभो अशी प्रार्थना व्यक्त करत मृत जवानांच्या कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जखमी जवानांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. (Marathi Latest News)

himachal
Rahul Gandhi: राहुल गांधी ५० वर्षाच्या म्हातारीला फ्लाईंग किस का देतील? काँग्रेस महिला नेत्याचे अजब विधान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी भरलेली एक जीप तिसाकडून बैरागड येथे जात होती. तेव्हा तरवाई नावाच्या स्टेशन जवळ आलेल्या जीपचे संतूलन बिघडले आणि जीप नदीत पडली. जीपमध्ये पोलिस बटालियन आणि दोन नागरिक होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. चीप नदीत पडल्यानंतर काही पोलिस बाहेर पडण्यात यशस्वी झाले तर काही मध्येच अडकून पडले. पोलिस घटनेच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.