Amethi Loksabha: स्मृती ईराणींचा पराभव करणारे किशोरीलाल शर्मा आहेत तरी कोण?

आक्रमक, बेधडक आणि पक्षाचा महिला चेहरा असणाऱ्या इराणी यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी |
Political Explainer: स्मृती ईराणींचा पराभव करणारे किशोरीलाल शर्मा आहेत तरी कोण?
Who is Kishori Lal Sharmasakal
Updated on

Neha saraf

Amethi Lok Sabha Election Result 2024: काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला. अमेठीतून २०१९साली काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या इराणी यांनाच आता काँग्रेसच्या किशोरलाल शर्मा यांनी घरी बसवलं आहे. आक्रमक, बेधडक आणि पक्षाचा महिला चेहरा असणाऱ्या इराणी यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे आणि म्हणूनच यामागची कारणंही समजून घेण्याची गरज आहे.

काल जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा पराभव झाला. अमेठीतून २०१९साली काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हरवून जायंट किलर ठरलेल्या इराणी यांनाच आता काँग्रेसच्या किशोरलाल शर्मा यांनी घरी बसवलं आहे. आक्रमक, बेधडक आणि पक्षाचा महिला चेहरा असणाऱ्या इराणी यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा आहे. (Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024)

कोण आहे किशोरीलाल शर्मा ?

किशोरीलाल शर्मा मागील तीस वर्षांपासून काँग्रेसशी निगडीत आहेत. हे फार प्रसिद्धीच्या झोतात नसतात मात्र काँग्रेसच्या वर्तुळात हे नाव सर्वपरिचित आहे. अतिशय शांतपणे ते पडद्यामागे पक्षाचं काम करतात, स्ट्रॅटेजीही बनवण्यातही त्यांचा वाटा आहे.महाराष्ट्र आणि इतर राज्यात ते माहिती नसले तरी दिल्ली वर्तुळात गांधी कुटुंबाच्या जवळचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे. (Smriti Irani vs Kishori Lal Sharma)

या संपूर्ण निवडणुकीत भाजपने केलेल्या चुका आणि काँग्रेसने आखलेली रणनीती समजून घेण्यासारखी आहे. पहिला मुद्दा म्हणजे काँग्रेसने शेवटपर्यंत इथला उमेदवारच जाहीर केला नाही. राहुल गांधीच इथून लढणार अशी चर्चा असताना अगदी एक दिवस शर्मा यांचं नाव घोषित करण्यात आलं आणि त्यांना हलक्यात घेणंच भाजपला महागात पडलं. संपूर्ण प्रचार काळात इराणी यांचा अतिआत्मविश्वास त्यांना नडला.

२०१९साली त्यांच्यासाठी राबलेली भाजपची यंत्रणाही यावेळी फारशी उत्साही नव्हती. उलट संपूर्ण यंत्रणा म्हणजे फक्त आणि फक्त इराणी बनल्या होत्या. दुसरीकडे शर्मा यांच्यासाठी त्यांचं काँग्रेससह त्यांचं संपूर्ण कुटुंब कामाला लागलं होत. त्यांची पत्नी आणि दोन्ही मुली खेड्यापाड्यात जाऊन लोकांना भेटत होती, नुक्कड सभा घेत होत्या. इकडे इराणींसाठी केवळ एकदा अमित शाह आणि मुख्यमंत्री योगी येऊन गेले पण तेवढंच पुरेसं ठरलं नाही.

अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रियांका गांधी. २०१९साली राहुल गांधींच्या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी त्यांनी ही बहीण चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळाली. त्यांनी ३ दिवस अमेठीत मुक्काम ठोकला आणि तब्बल १२ सभा घेतल्या. भेटणाऱ्या महिलांना त्यांना मिठी मारून भेटत होत्या, भावनिकदृष्ट्या आपलेपणा निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता. प्रत्येक भाषणात काँग्रेसने केलेली कामं आणि मुख्य म्हणजे अमेठीशी असलेलं नातंही सांगायला त्या विसरल्या नाहीत. इकडे इराणी यांच्याबाबत लोकांना ५ वर्षात काहीशी अढी निर्माण झाली होती.

Political Explainer: स्मृती ईराणींचा पराभव करणारे किशोरीलाल शर्मा आहेत तरी कोण?
Lok Sabha Elections 2024 Results Live Update: विद्यमान खासदारांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता...

त्यांनी अमेठीत घर तर घेतलं पण त्यांचा फारसा संपर्कच व्हायचा नाही असं स्थानिकांचं म्हणणं असायचं. तिथलं संजय गांधी हॉस्पिटलही त्यांनी बंद केलं आणि या रोषात वाढ झाली. या आणि अशा सगळ्या मुद्द्याचं परिवर्तन एका सुप्त लाटेत झालं ज्याची कल्पनाच इराणी आणि भाजपला अमेठीत आली नाही आणि त्यांचा पराभव झाला. या निमित्ताने काँग्रेसची परंपरा असलेली सीट जशी इराणींनी मिळवली तशीच आता त्यांची सीट काँग्रेसने परत मिळवून एक वर्तुळ पूर्ण केलंय. जनतेला गृहीत धरणाऱ्यांचा कायम पराभवच होतो हाच धडा अमेठीने दिलाय इतकंच.

Political Explainer: स्मृती ईराणींचा पराभव करणारे किशोरीलाल शर्मा आहेत तरी कोण?
Loksabha Election : अमेठी, रायबरेलीकडे मोदींची पाठ;अमित शहांचे रोड शो आणि सभा,उद्याच्या मतदानाकडे लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.