गेल्या 10 वर्षात काँग्रेस पक्षाचा 90 टक्क्यांहून अधिक निवडणुकांमध्ये पराभव झालाय.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) बिगर-काँग्रेस विरोधकांना एकत्र आणून देशभर दौरे करून नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर आता त्यांचे जवळचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनीही गांधी कुटुंबावर हल्लाबोल केलाय. कालच मुंबईत ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचं नाव घेत त्यांच्यावर हल्लाबोल केला होता आणि आता प्रशांत किशोर यांनीही असाच टोला लगावलाय.
विरोधी पक्षनेतृत्वाच्या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, लोकशाही मार्गानं निर्णय घ्यायला हवा. गेल्या 10 वर्षात काँग्रेस पक्षाचा (Congress Party) 90 टक्क्यांहून अधिक निवडणुकांमध्ये पराभव झालाय. त्यामुळं काँग्रेस ज्या कल्पना आणि व्याप्तीचं प्रतिनिधित्व करत आहे, ती प्रबळ विरोधी पक्षासाठी महत्त्वाची आहे. पण, काँग्रेस नेतृत्वाला आणि विशेषत: एका विशिष्ट व्यक्तीला हा 'दैवी' अधिकार नाही. कारण, ते सुद्धा गेल्या 10 वर्षात पक्ष 90% पेक्षा जास्त निवडणुका हरला आहे. अशा स्थितीत विरोधी पक्षाच्या नेतृत्वाचा निर्णय लोकशाही मार्गानं होऊ द्यायला हवा. ममता बॅनर्जींना विरोधी पक्षनेत्या म्हणून प्रोजेक्ट करण्यामागं प्रशांत किशोर यांचाच हात असल्याचं जाणकारांचं मत आहे. त्यामुळंच गोव्यापासून हरियाणापर्यंत मोठ्या संख्येनं काँग्रेस नेते टीएमसीमध्ये सामील झाले आहेत.
..तर टीएमसी गोव्यात निवडणूक का लढवू शकत नाही?
ममता बॅनर्जी यांनी काल (बुधवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. एवढंच नाही, तर त्या एका कार्यक्रमातही सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, काही लोक अर्धा वेळ परदेशातच घालवतात. मात्र, काहीच करत नाहीत. याशिवाय, काँग्रेस बंगालमध्ये निवडणूक लढवू शकते, तर टीएमसी गोव्यात निवडणूक का लढवू शकत नाही? असा सवालही त्यांनी केला होता. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत ममता बॅनर्जींना विरोधकांचा चेहरा म्हणून दाखवण्याची तयारी टीएमसी करत असल्याचं बोललं जातंय.
ममता बॅनर्जींवर खर्गेंचा हल्लाबोल
दरम्यान, काँग्रेसनंही उघडपणे ममता बॅनर्जींवर हल्लाबोल करत, त्या भाजपशी (BJP)संबंधित असल्याचं म्हटलंय. मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, भाजपला पराभूत करण्याचं काँग्रेसचं ध्येय आहे, परंतु काही लोक भाजपला दिल्ली केंद्रात सत्तेत राहण्यासाठी मदत करत आहेत. यूपीए अस्तित्वात नाही, हे ममता बॅनर्जींचं विधान पूर्णपणे चुकीचं आहे. तसेच राहुल गांधींवर वैयक्तिक टीका करणंही चुकीचं असल्याचं त्यांनी म्हंटलंय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.