Karnataka : 'या' दोन बड्या नेत्यांनी उडवली माजी पंतप्रधानांची झोप; आता पक्ष वाचवण्यासाठी करावा लागतोय संघर्ष

राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS) अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे.
HD Devegowda
HD Devegowdaesakal
Updated on
Summary

धजद १९९४-१९९९ मध्ये कर्नाटकात सत्तेत होता. आता केवळ एक छोटा विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व राहिले आहे.

बंगळूर : राज्य विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS) अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहे. धजद नेत्यांच्या हालचाली पाहता किमान राज्यात तरी आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भारतीय जनता पक्षाशी संधान साधण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.

‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ यानुसार धजद आता भाजपकडे (BJP) वाटचाल करीत असल्याचे दिसते. २००५ मध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलातून हकालपट्टी झाल्यानंतर सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे आता धजदचे पहिल्या क्रमांकाचे प्रतिस्पर्धी बनले आहेत. धजदचा एक मोठा गट काँग्रेसमध्ये सामील झाल्याने नेत्यांची झोप उडाली आहे.

या व्यतिरिक्त जुन्या म्हैसूर भागात धजदचा प्रभाव चिरडून टाकणारे वक्कलिग नेते आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) हे धजदचे आणखी एक प्रतिस्पर्धी बनले आहेत. उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाल्यानंतर शिवकुमार आपले वर्चस्व आणखी वाढवण्यास उत्सुक आहेत.

HD Devegowda
Karnataka चे नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या होणार 'बस कंडक्टर'; काय आहे कारण?

धजदचे सुप्रीमो एच. डी. देवेगौडा (H. D. Devegowda) यांचा दिल्ली दौरा आणि पक्षाची विधाने वरकरणी दिसतात, तितकी सोपी नाहीत. भाजपशी संधान बांधण्यासाठी देवेगौडांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे यावरून दिसून येते. इतर विरोधी पक्ष आणि त्यांचे जुने मित्र या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असतानाही देवेगौडा यांनी नवीन संसद भवनाच्या उद्‍घाटना हजेरी लावणे हे धजद-भाजप संबंध खूपच सुधारले असल्याचे द्योतक आहे.

HD Devegowda
Monsoon Season : मिरगाचा मुहूर्त टळला, आता पाऊस आणखी एक आठवडा लांबणार? शेतकरी चिंतेत

आगामी लोकसभा निवडणुकीत धजद, भाजपसोबत युती करणार का, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर दोन्ही पक्षांकडे नाही. मात्र भाजप-धजद खुली युती करणार नसून सलोख्याचे राजकारण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत चामुंडेश्वरी मतदारसंघात भाजपने आपली मते धजदकडे वळवल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. या मतदारसंघात जी. टी. देवेगौडा यांना १.२१ लाख मते मिळाली होती. तर भाजपला मते २०१८ मध्ये १२ हजार ६४ मते मिळाली होती.

HD Devegowda
Karnataka : बुद्ध-बसव-आंबेडकरांना मानणारा नेता बनला बेळगावचा 'पालकमंत्री'; मुख्यमंत्र्यांकडून नियुक्ती

पण, २०२३ मध्ये ५१ हजार ३१८ पर्यंत म्हणजे चारपटीने मतांची वाढ झाल्याने तेथे मतांचे ‘हस्तांतरण’ झाले होतो हे स्पष्ट झाले. धजदचे माजी अध्यक्ष बी. सोमशेखर यांनी सहा आठवड्यांपूर्वी पक्ष सोडताना हे ‘गुप्तरहस्य’ उघड केले होते. या निवडणुकीत धजदला केवळ १९ जागा मिळाल्याने ताकद कमी झाली आहे. परिणामी धजद पूर्वीपेक्षा अधिक कमकुवत बनला आहे. मंड्या लोकसभा मतदारसंघात सात जागावरून धजदला एक जागा जिंकता आली. त्यांच्या मतांची १३.९ टक्यांनी कमी झाली आहे.

HD Devegowda
Monsoon Season : यंदाही मॉन्सूनचं वेळापत्रक बदललं; खरीप हंगामातील शेतीवर होणार परिणाम

दक्षिणेतही प्रभाव ओसरला

धजद १९९४-१९९९ मध्ये कर्नाटकात सत्तेत होता. आता केवळ एक छोटा विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व राहिले आहे. धजदने उत्तर कर्नाटकातील लिंगायत समाजाचा पाठिंबाही गमावला. आता दक्षिणेतील वक्कलिग समाजावरील प्रभावही ओसरला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()