धर्माचं राजकारण यूपीसाठी अफूची गोळी; PM मोदींवर शिवसेनेची टीका

धर्माचं राजकारण यूपीसाठी अफूची गोळी; PM मोदींवर शिवसेनेची टीका
ANI
Updated on

नवी दिल्ली : अयोध्या आणि राम मंदिराचा मुद्दा वेगळा होता, आजचे प्रश्‍न वेगळे आहेत. ते आहेत बेरोजगारी, कोरोना-ओमीक्रॉन, शेतकऱ्यांचे प्रश्‍न, महागाई. ही आक्रमणे होत असताना आपण सातत्याने धर्माचे विषय घेऊन लोकांना प्रभावित करणे, मतांचे ध्रुवीकरण करणे हे सर्व उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी सुरू आहे, असा पलटवार शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला. (Shiv Sena criticism on PM Modi)

धर्माचं राजकारण यूपीसाठी अफूची गोळी; PM मोदींवर शिवसेनेची टीका
Elon Musk : एलॉन मस्क ठरले टाइम 'पर्सन ऑफ द इयर'

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज काशी विश्‍वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन केले. त्याबद्दल विचारले असता सावंत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. राजकारणासाठी धर्माच्या रूपाने अफूची गोळी देण्यासारखा हा प्रकार आहे. हे केवळ भाजपच्या बाजूने नव्हे; तर असदुद्दीन ओवेसी देखील तेच करीत आहेत. ते सध्या भाजपचे काम करीत असल्यासारखे वाटते. भाजपला हवे ते घडविण्याचे काम ओवेसी करतात.

संजय राऊत यांची पाठराखण

संजय राऊत यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल झाला हे सूडाचे राजकारण आहे. मुंबईच्या महापौरांच्या अपमानानंतर आशिष शेलार यांना लक्ष्य केल्यानंतर दिल्लीत राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होतो. मुळात राऊत यांनी वापरलेल्या शब्दाचा अर्थ हा मूर्ख किंवा महामूर्ख असा होतो. त्यामुळे कुणाचा अपमान होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. हा जाणीवपूर्वक केलेला छळ आहे. बुद्धिबळातील प्याद्यांसारखी आव्हाने देऊ नका, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

धर्माचं राजकारण यूपीसाठी अफूची गोळी; PM मोदींवर शिवसेनेची टीका
Omicron In Latur|लातुरात ओमिक्रॉनचा शिरकाव,मराठवाड्यातील पहिला रूग्ण

स्वातंत्र्यलढाच सर्वांत मोठा

राम मंदिराची चळवळ ही स्वातंत्र्य चळवळीपेक्षा मोठी होती, असे विधान विश्‍व हिंदू परिषदेच्या नेत्याने केले आहे. त्यावर सावंत म्हणाले, ‘‘राम मंदिराची उभारणी हा विषय मोठाच होता. परंतु त्याची तुलना स्वातंत्र्य चळवळीबरोबर होऊच शकत नाही. सध्या कुणीही उठते आणि उचलली जीभ, लावली टाळ्याला असे सुरू आहे. स्वातंत्र्य हे प्रचंड मोठा लढा देऊन, संघर्ष करून मिळवलेले आहे. त्यामुळे एखाद्या मंदिराचा लढा आणि स्वातत्र्यांचा लढा याची तुलना होऊ शकत नाही. स्वातंत्र्य मिळाले नसते, तर मंदिर उभे राहिले असते का, याचा विचार केला पाहिजे.’’

धर्मावर आधारित या देशात कुणालाही आरक्षण मिळालेले नाही. मागास जात, समाज आहे, त्यांना आरक्षणे मिळाली आहेत. त्यात मराठा जातीचाही समावेश आहे. त्याची तुलना एखाद्या धर्माबरोबर करणे हे गैर आहे. ओवेसी ही तुलना करीत आहेत. मला वाटते ते भाजपचे काम करीत आहेत, असंही ते म्हणाले.

दुसरीकडे काँग्रेसनेही मोदींच्या या दौऱ्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय की, ज्या गंगेत त्यांच्या नाकर्तेपणामुळे प्रेतं तरंगली त्या गंगेत स्नान, ज्या मजूरांना कोविडमुळे शेकडो किलोमीटर उपाशी-तापाशी स्थलांतर करावं लागलं त्या मजूरांसोबत जेवण. याने पापक्षालन होईल असं वाटतंय का? असा रोखठोख सवाल त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.