Poonch Terror Attack : ग्रेनेड हल्ल्यात पाच जवानांचा होरपळून मृत्यू; लष्करानं शहीद जवानांची यादी केली जाहीर

दहशतवादी हल्ल्यानं जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) पुन्हा हादरलं आहे.
Poonch Terror Attack
Poonch Terror Attackesakal
Updated on
Summary

मुसळधार पावसामुळं कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला.

Poonch Terror Attack : दहशतवादी हल्ल्यानं जम्मू-कश्मीर (Jammu and Kashmir) पुन्हा हादरलं आहे. राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला (Grenade Attack By Terrorists) केला. त्यामुळं ट्रकला भीषण आग लागली.

त्यातील पाच जवान शहीद झाले, तर एक जवान जखमी झाला. पूंछ जिल्ह्यात भीमबर गली ते संगिओतकडं दुपारी तीनच्या सुमारास हा हल्ला झाला. दरम्यान, लष्करानं युद्धपातळीवर सर्च ऑपरेशन सुरू केलंय.

याचदरम्यान, भारतीय लष्करानं (Indian Army) शहीद जवानांची नावं जाहीर केली आहेत. दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पाच जवानांमध्ये हवालदार मनदीप सिंग, लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंग, शिपाई हरकृष्ण सिंग आणि शिपाई सेवक सिंग यांचा समावेश आहे. हे सैनिक राष्ट्रीय रायफल युनिटमध्ये तैनात होते आणि दहशतवादविरोधी ऑपरेशनमध्ये कार्यरत होते.

Poonch Terror Attack
PM Modi : तथागत बुद्धांनी दाखवलेल्या मार्गावर जग चाललं असतं तर..; शिखर परिषदेत काय म्हणाले मोदी?

राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केल्यावर ही घटना घडली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले, तर एक जखमी झाला. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्यात आलं, मात्र हल्लेखोरांचा तपशील अद्याप सापडलेला नाही.

Poonch Terror Attack
Twitter Blue Tick : ट्विटरनं बंद केली ब्ल्यू टिक; विराट, धोनी ते बिग बींपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा यादीत समावेश

लष्करानं सांगितलं की, मुसळधार पावसामुळं कमी दृश्यमानतेचा फायदा घेत अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांच्या संभाव्य ग्रेनेड हल्ल्यामुळं लष्कराच्या ट्रकला आग लागली. रिपोर्टनुसार, या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैशच्या PAFF नं घेतली आहे. PAFF चे प्रवक्ते तन्वीर अहमद राथर यांनी एका निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जम्मू-काश्मीरमधील जी-20 बैठकीला लक्ष्य केलं जाईल, अशी धमकीही त्यांनी दिलीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.