अशोक नगर- मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने अनेकांनी वेगवेगळ्या ट्रिक्स वापरल्या असतील. अवेकजण खिडकीजवळ जाऊन बसतात, कोणी छतावर जातं, तर अनेकजण बाल्कनीमध्येच आपलं बस्तान बसवतात. अशीच वेळ मध्य प्रदेशच्या मंत्र्यांना आल्याचं दिसून आलं. लोक आरोग्य मंत्री बृजेंद्र सिंह यादव यांनी खराब नेटवर्कमुळे आकाशपाळण्यात 50 फूट उंचीवर बसण्याची वेळ आली. त्यांना कराव्या लागलेल्या या जुगाडामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगू लागली आहे. काहींनी हाच 'डिजिटल भारत' आहे का, अशी फिरकी घेतली आहे.
बृजेंद्र सिंह अशोकनगर जिल्ह्यातील चंदेरी तालुक्यात येणाऱ्या एका गावात आले होते. आमखा नावाचे हे गाव चारी बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. सिंह या गावात नऊ दिवस भागवत कथाच्या कार्यक्रमासाठी आले आहेत. कार्यक्रमास्थळी यात्रा भरली होती. याठिकाणी आकाशपाळणे लावण्यात आले होते. मोबाईलला नेटवर्क मिळत नसल्याने मंत्र्याने उंच ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी जवळपास 50 फूट उंच असणाऱ्या आकाशपाळण्यावर सर्वात वरती जाऊन बसण्याचं ठरवलं. यासंबंधीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यासंबंधी मीम्स तयार केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात मोबाईल नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे मंत्र्यांना जेव्हा नेटवर्कची अडचण झाली, तेव्हा त्यांनी आकाशपाळण्यात बसून उंचावर जाण्याचा निर्णय घेतला. बृजेंद्र सिंह यांनी सर्वात वरती आकाशपाळणा थांबवला आणि त्यांनी नेटवर्क मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यांना याठिकाणी नेटवर्क मिळाले आणि त्यांनी येथून मोबाईलवर दुसऱ्याशी संपर्कही साधला.
फोटो व्हायरल झाल्यानंतर मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, स्थानिक लोक मदतीसाठी माझ्याकडे येत आहेत. मोबाईल नेटवर्क वीक असल्यामुळे मी त्यांची मदत करण्यास असमर्थ ठरत आहे. नेटवर्क मिळावा यासाठी मी आकाशपाळण्यावर जाऊन बसलो. मी तेथून अधिकाऱ्यांशी बोलत होतो आणि लोकांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत होता. मी नऊ दिवस या गावात राहणार असून भागवत कथा आणि श्रीराम महायज्ञ करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.