Popularity Survey of CM: सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये योगींना कोणी टाकलं मागे? जाणून घ्या पहिले 5 मुख्यमंत्री

योगी आदित्यनाथ यांना मागे टाकून पहिल्या स्थानी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पहिल्या स्थानावरील नाव काहीसं आश्चर्यकारक आहे. ( Top 5 Most Popular Chief Ministers Revealed)
Yogi Adityanath
Yogi Adityanath
Updated on

नवी दिल्ली- भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांसंबंधात एक सर्व्हे करण्यात आला होता. यातून आलेले निष्कर्ष रंजक आहेत. या सर्व्हेनुसार, सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दुसऱ्या क्रमांकावर आहे. योगी आदित्यनाथ यांना मागे टाकून पहिल्या स्थानी कोण आहे, असा प्रश्न अनेकांना पडला असेल. पहिल्या स्थानावरील नाव काहीसं आश्चर्यकारक आहे.

सर्व्हेनुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांना ५२.७ टक्के रेटिंग मिळाली आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या योगी आदित्यनाथ यांना ५१.३ लोकप्रियता रेटिंग मिळाली आहे. तिसऱ्या स्थानी आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्व शर्मा आहेत. त्यांना ४८.६ लोकप्रियता रेटिंग मिळाली आहे. (Popularity Survey Top 5 Most Popular Chief Ministers Revealed Yogi Adityanath second who is first)

Yogi Adityanath
PM Modi Successor : योगी-शाह की गडकरी? पीएम मोदींचा उत्तराधिकारी कोण, सर्व्हेतून समोर आली माहिती

चौथे स्थान गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना मिळालं आहे. त्याना ४२.६ टक्के रेटिंग आहे. विशेष म्हणजे त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनीही या यादीत स्थान मिळवलंय. डॉ. माणिक साहा यांनी ४१.४ टक्के लोकप्रियता रेटिंग सह पाचवे स्थान पटकावलं आहे. नेत्यांची लोकप्रियता आणि मान्यता तपासून पाहण्यासाठी माध्यमांनी एक सर्व्हे केला होता.

Yogi Adityanath
Farmer Protest: दिल्लीकडे कूच की घर वापसी? केंद्र आणि शेतकरी संघटनांमध्ये आज महत्त्वाची बैठक; कुठे अडकलं प्रकरण?

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांना पाचवे स्थान मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्रिपुराच्या लोकांनी मुख्यमंत्री साहा यांचे कौतुक केलं आहे. त्यांचा साधेपणा, प्रामाणिकपणा लोकांना भावत आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ते कायम पुढे असतात. ते जमिनीस्तरावर राहून लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतात, असं एका दुकानविक्रेत्याने प्रतिक्रिया दिली.

दंत डॉक्टर असलेले माणिक साहा यांनी भाजपला त्रिपुरामध्ये सत्तेपर्यंत पोहोचवलं. ते सलग दुसऱ्यावेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी २०१६ मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. साहा यांना २०२० मध्ये प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं होतं. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.