लोकसंख्या नियंत्रणाला सरकारचा नकार; आणीबाणीच्या काळात झालेल्या नसबंदीची झाली आठवण

sanjay gandhi and indira gandhi.
sanjay gandhi and indira gandhi.
Updated on

देशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर त्याचे नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्याची मागणी वारंवार होत आली आहे. देशाचा एक मोठा वर्ग सामाजिक-शैक्षणिक आणि आर्थिकदृष्या मागसलेला आहे. तसेच धार्मिक कारणामुळे लोक कुटुंब नियोजनाचे (Family Planning)  सहाय्य घेत नाहीत. त्यामुळे आपले कुटुंब एक किंवा दोन मुलांपर्यंत सिमित ठेवणारे दुसऱ्या वर्गातील लोकांना दोष देत असतात. त्यांच्यामुळे देशाच्या साधनसंपत्तीवर ओझे पडतं असं ते म्हणत असतात. याशिवाय राजकीय क्षेत्रातही लोकसंख्या नियंत्रणासंबंधी कायदा करण्याची मागणी होत असते. विशेष म्हणजे, 2014 मध्ये भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर ही मागणी जोर पकडू लागली आहे. 

"दिल्लीत प्रचंड थंडी; शेतकऱ्यांची काळजी वाटते, त्यांनी माघार घ्यावी...

1975 मध्ये आणीबाणीच्या दरम्यान नागरिकांच्या अधिकारांवर बंधन आणण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात जे निर्णय घेतले, त्यातील वादग्रस्त ठरला नसबंदीचा. इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी या अभियानाची मागच्या दरवाजाने धुरा संभाळली होती. संजय गांधींनी नसबंदीचे अभियान यशस्वी करण्यासाठी अधिकाऱ्यांना टार्गेट दिले होते. जे अधिकारी नसबंदीचे टार्गेट पूर्ण करणार नाहीत, त्यांचे वेतन कपात केली जाईल अशी ताकीद त्यांनी दिली होती. 

विविध रिपोर्टनुसार, अभियानाअंतर्गत एका वर्षात तब्बल 62 लाख पुरुषांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली होती. ही संख्या नाझी जर्मनीच्या काळात झालेल्या नसबंदीपेक्षा 15 पटीने अधिक होती. नसबंदीदरम्यान झालेल्या निष्काळजीपणामुळे 2 हजार पुरुषांचा मृत्यू झाला होता. संजय गांधी यांनी उग्रपणे राबवलेल्या अभियानाची बळी प्रामुख्याने गरीब जनता ठरली. सरकारी अधिकाऱ्यांनी आपले टार्गेट पूर्ण करण्यासाठी विविध मार्गांनी अनेक गरीब पुरुषांना नसबंदी करायला लावली. अनेकदा 80 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या वयस्कर लोकांची नसबंदी करण्यात आली. पोलिसांनी गावाला घेरले आणि गावातील पुरुषांना नसबंदी करण्यास भाग पाडले, अशा बातम्याही समोर आल्या होत्या. या अभियानाचा उल्लेख सलमान रश्दी यांच्या 'मिडनाइट चिल्ड्रन' या कांदबरीत करण्यात आला आहे. 

इराण सरकारने पत्रकाराला दिली फाशी; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

नसबंदीच्या बाबतीत भारताचा इतिहास अत्यंत वाईट राहिला आहे. नेहमीच यामध्ये गरीब आणि वंचित लोकांना लक्ष्य करण्यात आले आहे. 1970 च्या दशकात कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तेव्हापासून लोकसंख्या नियंत्रणासाठी महिलांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. पण, वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार महिलांच्या तुलनेत पुरुषांची नसबंदी करणे सोपे असते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.