UN Population Report : 'चीनला मागं टाकून भारत बनला जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश'

संयुक्त राष्ट्रसंघानं आज (बुधवार) लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली.
UN Population Report
UN Population Reportesakal
Updated on
Summary

युनायटेड स्टेट्स 340 दशलक्ष लोकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

संयुक्त राष्ट्रसंघानं आज (बुधवार) लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली. लोकसंख्येच्या अहवालानुसार, भारत या वर्षाच्या मध्यापर्यंत जवळपास 3 दशलक्ष लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनण्यासाठी चीनला मागं टाकण्याच्या मार्गावर आहे.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या (UNFPA) स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 मधील डेटा चीनच्या 1.4257 अब्जांच्या तुलनेत भारताची लोकसंख्या 1,428.6 दशलक्ष किंवा 1.4286 अब्ज आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मागील आकडेवारीच्या आधारे भारत या महिन्यात चीनला मागं टाकेल, असा अंदाज लोकसंख्या तज्ञांनी व्यक्त केलाय. पण, हा बदल कधी होणार हे यूएनच्या या नव्या अहवालात सांगण्यात आलेलं नाही.

युनायटेड स्टेट्स 340 दशलक्ष लोकसंख्येसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालात असं म्हटलंय की, डेटा फेब्रुवारी 2023 पर्यंत उपलब्ध माहितीवर आधारित आहे. भारताची लोकसंख्या गेल्या वर्षी 1.56 टक्क्यांनी वाढली आहे. ती 1,428,600,000 दशलक्ष (142.86 दशलक्ष) असल्याचा अंदाज आहे. तिथल्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश किंवा 68 टक्के लोक 15 ते 64 वयोगटातील आहेत, असं इंडियन एक्सप्रेसनं वृत्त दिलंय.

UN Population Report
Karnataka Election : काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर; माजी मुख्यमंत्री शेट्टर हुबळी-धारवाडमधून लढणार

ताज्या अहवालात असंही दिसून आलंय की, भारताचा एकूण प्रजनन दर 2.0 आहे. म्हणजे, भारतात एक महिला 2 मुलांना जन्म देते. भारतीय पुरुषांचं सरासरी आयुर्मान 71 वर्षे आणि महिलांचं 74 वर्षे आहे.

UN Population Report
Karnataka Election : भाजपनंतर आता काँग्रेसमध्ये बंडखोरी; तिकीट न मिळाल्यानं माजी खासदाराचा राजीनामा

भारत, ब्राझील, इजिप्त, फ्रान्स, हंगेरी, जपान, नायजेरिया आणि युनायटेड स्टेट्स या आठ देशांतील 7,797 लोकांना लोकसंख्येच्या मुद्द्यांवर त्यांचं मत ऑनलाइन विचारण्यात आलं. भारतातून 1,007 चं सर्वेक्षण ऑनलाइन करण्यात आलं. लोकसंख्येशी संबंधित सर्वात महत्त्वाच्या बाबी ओळखताना 63 टक्के भारतीयांनी लोकसंख्येतील बदलाचा विचार करताना विविध आर्थिक समस्यांना प्रमुख चिंता म्हणून ओळखलं. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि प्रजनन दर खूप जास्त आहे.

UN Population Report
India Coronavirus Cases: सावधान! कोरोनाचा धोका वाढतोय; देशात 24 तासांत आढळले तब्बल 10 हजारांहून अधिक रुग्ण

इंडियन एक्स्प्रेसनं यूएन लोकसंख्येच्या अहवालाचा हवाला देत म्हटलंय, 68 देशांतील 44 टक्के सहभागी महिला आणि मुलींना लैंगिक संबंध, गर्भनिरोधक वापरणं आणि आरोग्य सेवा मिळवण्याचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. जगभरातील अंदाजे 257 दशलक्ष महिलांना सुरक्षित, विश्वासार्ह गर्भनिरोधकांची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.