नवी दिल्ली : दिल्ली महापालिकेनं आपल्या शाळांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये आता क्रांतीकारी भगतसिंग आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. दिल्लीच्या महापौर शेली ओबेरॉय यांनी याची घोषणा केली. (Portraits of Bhagat Singh and B R Ambedkar will be put up at all MCD run schools)
विद्यार्थ्यांना या महापुरुषांचं बलिदान आणि विचार कळावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापालिकेकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं यामध्ये या निर्णयाची घोषणा करण्यात आली. महापौर कार्यालयानं याबाबत म्हटलं की, हा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या शहीद-ए-आझम भगत सिंग आणि घटनाकार डॉ. आंबेडकर यांचा संदेश जनतेमध्ये पोहोचवण्याच्या धोरणाचा भाग आहे.
दरम्यान, आम आदमी पार्टीचं सरकार जिथं जिथं आहे, तिथं भगत सिंग आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावण्याचा धोरणात्मक निर्णय पक्षानं घेतला आहे. त्यानुसार सुरुवातीला दिल्ली सरकारमध्ये हा नियम लागू करण्यात आला. त्यानंतर पंजाबमध्ये आपचं सरकार आल्यानंतर तिथं देखील या दोन महापुरुषांचे फोटो लावण्याचा नियम लागू करण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.