नवी दिल्ली : प्रशांत महासागरात यंदाच्या वर्षअखेरीस ला निना सक्रिय होण्याची ६० टक्के शक्यता असून, त्यामुळे उत्तर भारतात यंदाचा हिवाळा नेहमीपेक्षा कडक असू शकतो, असा अंदाज आहे. जागतिक हवामान संस्थेच्या दीर्घकालीन अंदाज केंद्राने हा अंदाज वर्तविला आहे.
प्रशांत महासागरात सध्या न्यूट्रल स्थिती असून सध्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत या स्थितीत बदल होऊ ला निना विकसित होण्याची ५५ टक्के शक्यता आहे. त्यानंतर यंदाच्या ऑक्टोबर महिन्यापासून फेब्रुवारी २०२५ पर्यंत त्यात थोडी वाढ होऊन ही टक्केवारी ६० वर पोचू शकते. मॉन्सूनवर विपरीत परिणाम करणारी एल निनोची अवस्था पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नगण्य आहे.