लॉकडाउनमध्ये पोस्टमनचे पुनरागमन;आजारी व्यक्ती,ज्येष्ठ नागरिकांसाठी ठरले देवदूत

postman
postman
Updated on

चंडीगड - आजघडीला कुरिअर अन् डिलीव्हरी बॉय यांची चातकासारखी प्रतीक्षा केली जाते, पण त्यांच्याआधी जो सुख दुःखाचा साथीदार असायचा त्या पोस्टमनने लॉकडाउनच्या काळात पुनरागमन केले आहे. संकटाच्या या काळात आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी तर तो देवदूत ठरला आहे. 

हिमाचल प्रदेशातील उना येथील आठ वर्षांच्या मुलीचे कॅन्सरवरील औषधे संपायला आली होती, अशावेळी पोस्टमनमुळे ही महत्त्वाची औषधे त्यांना वेळेत मिळाली आहेत. भारतीय टपाल खात्याच्या पंजाब विभागाने खास व्यवस्था करून दुसऱ्या राज्यातून हे औषध मागविले. प्रवासाची साधने बंद असल्यामुळे पोस्टाची व्हॅन घेऊन पोस्टमन उना येथे गेला आणि त्याने मुलीच्या आईला औषधाचा बॉक्स दिला. केंद्रीय दळणवळण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्याकडे या मुलीच्या कुटुंबीयांनी मदत मागितली होती. त्यानंतर त्यांनी आदेश दिला होता, मात्र नेहमीचे काम समजून अशी मदत अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लॉकडाउनच्या काळातील टपाल खात्याची कार्यपद्धती 
- औषधे, वैद्यकीय मदत, साहित्य, टेस्टिंग किटची डिलीव्हरी- डॉक्टर, रुग्ण, ज्येष्ट नागरिक अशांची सोय- हिमाचल प्रदेशातील बड्डी येथील औषधांचे देशभर वितरण. 
- धर्मशाला येथील आयुर्वेदिक औषधांची डिलीव्हरी- लुधियानामधील होमिओपॅथीच्या औषधांचेही वितरण. 
- दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टाच्या व्हॅनचा मोठ्या प्रमाणावर वापर. 
- सामाजिक सुरक्षा पेन्शनची घरपोच रक्कम. 
- विविध सरकारी योजनांच्या थेट लाभार्थ्याला घरपोच रक्कम 

रकमेचे पंजाबमधील आकडे : दहा हजारहून जास्त व्यवहार, सुमारे दोन कोटी रक्कम- पोस्टात खाते नसलेल्यांनाही रकमेचे वाटप वृद्ध व्यक्ती किंवा वयस्कर जोडपे दिसले आणि किराणा मालासारख्या वस्तू आणण्यासाठी त्यांना मदतीची गरज असेल तर सदिच्छेची कृती म्हणून पुढाकार घ्या असे आम्ही पोस्टमनना सांगितले आहे. आमच्या खात्यातील अनेकांनी स्वयंसेवकाच्या भूमिकेतून फेरीवाले, हाताने रिक्षा ओढणारे, रुग्णांचे मदतनीस तसेच स्थलांतरित कामगारांना भोजन पुरवीत आहेत. त्यासाठी ते आपल्या पातळीवर रक्कम जमवितात आणि मग अन्न-नागरी पुरवठा खात्याची मदत घेतात. 
- व्ही. के. तिवारी, मुख्य पोस्टमास्टर जनरल, पंजाब 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.