Praful Patel : ''नरेंद्र मोदींना तिसरी टर्म मिळावी म्हणून प्रयत्न करणार'' प्रफुल्ल पटेल असं का म्हणाले?

ajit pawar
ajit pawaresakal
Updated on

मुंबईः लोकसभेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत. विरोधकांनी इंडिया नावाने नवीन आघाडी उघडली आहे. तर दुसरीकडे भाजपने 'एनडीए'ला पुन्हा उजाळा दिला असून सर्व पक्षांना एकत्रित करण्यास सुरुवात केलीय. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोदींच्या पंतप्रधान पदाबद्दल एक विधान केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळावी, यासाठी प्रयत्न करणार का? असा प्रश्न प्रफुल्ल पटेल यांना विचारण्यात आला. त्यावर पटेल म्हणाले की, आम्ही आत्ताच एनडीएमध्ये सहभागी झालेलो आहोत. देशाला स्थिर सरकारची गरज आहे. त्यामुळे आम्ही ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

ajit pawar
Narendra Modi : 'लाल टोमॅटोवर चर्चा करा, लाल डायरीची नाही'; गेहलोत यांचा मोदींवर पलटवार

अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलतांना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, अजित पवार हे लोकप्रिय आणि ताकदवान नेते आहेत. त्यामुळे त्यांना आज ना उद्या मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल. आम्ही त्या दिशेने काम करत आहोत, असंही सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

नरेंद्र मोदींबद्दल बोलतांना पटेल म्हणाले, आपला जीडीपी दहाव्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. त्यामुळे स्थिर आणि विकसनशील सरकारची गरज आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी सर्वांची अपेक्षा आहे.

ajit pawar
Pune ATS News: कोंढव्यात दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यास ATS कडून अटक, समोर आली मोठी अपडेट

दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा होत आहे. दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी असं काहीही होणार नसल्याचं स्पष्ट केलं. तरीही विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित केला जातोय. त्यामुळे पावसाळी अधिवेशनानंतर राज्यात भाकरी फिरवली जाणार का? अशा चर्चा सुरु झालेल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.