महाविश्वासघाती आघाडी, प्रकाश जावडेकर यांची राज्य सरकारवर टीका

'इतके भ्रष्ट, बेकार आणि संधीसाधू सरकार महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले नाही.'
Prakash Javadekar
Prakash Javadekar
Updated on

नवी दिल्ली : उद्धव ठाकरे सरकारला (Uddhav Thackeray Government) आज दोन वर्ष पूर्ण झाली. इतके भ्रष्ट, बेकार आणि संधीसाधू सरकार महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले नाही, अशी टीका माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. ते आज रविवारी (ता.२८) एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. जावडेकर पुढे म्हणतात, या सरकारला महाविकास आघाडी म्हटले जाते. मात्र दोन वर्षांतील त्यांचे कर्तृत्व पाहिल्यानंतर लोकांनी तिला महावसूली आघाडी असे नाव ठेवले आहे. मी आज या आघाडीचे महाविश्वासघाती आघाडी असे नामकरण करतो, असा टोला प्रकाश जावडेकर यांनी (BJP) लगावला आहे. (Two Years Of Mahavikas Aghadi)

Prakash Javadekar
Ashok Chavan | महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे राहणार : अशोक चव्हाण

महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याची खलबते आताही भाजपकडून सुरु असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचा फोटो भाजपकडून शेअर करण्यात आला होता. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सरकार मार्चमध्ये पडेल असे भाकित वर्तवले होते. मात्र महाविकास आघाडीचे नेते सरकार पाच वर्षे टिकेल अशा त्या भाकिताला उत्तर देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.