Pranab Mukherjee Birth Anniversary : मोदींच्या गुजरातची प्रणवदांना होती भुरळ; स्वतःची ओळख सांगायचे...

प्रणव मुखर्जी यांच्यावर गुजराती संस्कृतीचा खूप प्रभाव होता.
Pranab Mukherjee
Pranab MukherjeeSakal
Updated on

Pranab Mukherjee Birth Anniversary : दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची आज जयंती आहे. प्रणवदांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमधील वीरभूमी जिल्ह्यातील मिराटी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कामदा किंकर मुखर्जी आणि आईचे नाव राजलक्ष्मी मुखर्जी होते. प्रणवदांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा कामदा 1952 ते 1964 या काळात पश्चिम बंगाल विधान परिषदेचे सदस्यही होते. प्रणव मुखर्जी यांचे प्राथमिक शिक्षण वीरभूमीतूनच झाले.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

Pranab Mukherjee
प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारुन दिला होता आश्चर्याचा धक्का!

प्रणवदांवर होता गुजराती संस्कृतीचा प्रभाव

प्रणव मुखर्जी यांच्यावर गुजराती संस्कृतीचा खूप प्रभाव होता. 2012 मध्ये प्रणव मुखर्जी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर होते. तेव्हा ते म्हणाले होते की, हा प्रदेश त्यांच्या हृदयात वसतो. गुजराती जनतेने नेहमीच प्रेम दिले आहे. देशाच्या स्वातंत्र्यात गुजरातच्या भूमीचे महत्त्वाचे योगदान असल्याचेही ते नेहमी म्हणायचे. प्रणव मुखर्जी यांच्यावर महात्मा गांधी यांचा खूप प्रभाव होता. प्रणव मुखर्जी त्यांच्या राजकीय जीववनात अनेकदा गुजरातमध्ये आले होते. एवढेच नव्हे तर, त्यांनी अनेक विकास योजनांची पायाभरणी आणि उद्घाटनही केले होते.

Pranab Mukherjee
World Human Rights Day : जान जाएगी मगर...; अंतिम श्वासापर्यंत हिरावून न घेता येणारे 10 अधिकार

गुजराती भाषा कळत नाही पण...

भरूच-अंकलेश्वर दौऱ्यादरम्यान प्रणव मुखर्जी यांनी मला गुजराती भाषा कळत नसल्याचे सांगितले होते. पण, गुजराती संस्कृतीने नेहमीच आकर्षित केल्याचे ते म्हणत असत. गुजरातमधील राजकारण्यांच्या मदतीमुळेच एकदा ते राज्यसभेचे खासदार बनले होते असा दावा त्यांनी केला होता. यामुळे आपणही एकप्रकारे गुजरातीच असल्याचे ते सांगत. प्रणव मुखर्जी 5 वेळा राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. तर 2 वेळा लोकसभेचे खासदार म्हणून ते विजयी झाले होते.

शिक्षक म्हणून आले होते अहमदाबादला

2018 मध्ये एकदा प्रणव मुखर्जी गुजरातमध्ये आले होते. यावेळी ते एक राजकीय नेता म्हणून नव्हे तर, शिक्षक म्हणून अहमदाबाद येथे आले होते. येथे त्यांनी आयआयएम-अहमदाबाद येथील मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना संविधान, राजकारण आणि सार्वजनिक धोरणातील बारकावे समजावून सांगितले होते. 1969 मध्ये प्रणव मुखर्जी यांनी राजकीय प्रवास सुरूवात केली होती. याच वर्षी ते पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले. यानंतर 1975, 1981, 1993 आणि 1999 मध्ये ते राज्यसभेवर पुन्हा निवडून आले. प्रणव मुखर्जी गुजराती लोकांच्या औद्योगिक आणि उद्योजकांचे चाहते होते. गुजरातचा आर्थिक विकास दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे मत प्रणवदांचे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.