अदानी समूहाला एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सा मिळणार आहे.
अदानी समूहाची NDTV विकत घेण्याची खुली ऑफर असतानाच NDTV संचालक प्रणय रॉय (Prannoy Roy) आणि राधिका रॉय यांनी (Radhika Roy) त्यांच्या पदांचा राजीनामा दिलाय. एनडीटीव्ही लिमिटेडनं मंगळवारी स्टॉक एक्सचेंजला ही माहिती दिली.
दोघांचे राजीनामे तात्काळ मंजूर करण्यात येणार आहेत. सुदिप्त भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि संथिल समिया चंगलवारयान यांना तत्काळ NDTV चं संचालक बनवण्यात आलंय. आरआरपीआर होल्डिंगनं स्टॉक एक्स्चेंजला पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, शेअर्सच्या हस्तांतरणामुळं अदानी समूहाला (Adani Group) एनडीटीव्हीमध्ये 29.18 टक्के हिस्सा मिळणार आहे. यासह अदानी समूह 5 डिसेंबरला अतिरिक्त 26 टक्के समभागासाठी खुली ऑफर देत आहे.
ऑगस्टमध्ये अदानी समूहानं मीडिया फर्ममधील 29.18 टक्के हिस्सा अप्रत्यक्षपणे विकत घेतल्यानंतर ओपन ऑफर ठेवण्याची आवश्यकता सुरू झाली. भारताच्या भांडवली बाजार नियामकानं या महिन्याच्या सुरुवातीला खुल्या ऑफरला मान्यता दिली होती. अदानींनी कंपनीत रस दाखवल्यानंतर एनडीटीव्हीचे शेअर्सही वाढले आहेत. यावर्षी जवळपास 250 टक्के शेअर्स वाढले आहेत.
अदानी समूहानं NDTV प्रवर्तक RRPR होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडमधील 99.5 टक्के हिस्सा विकत घेतला आहे. अदानी समूहानं 2009 आणि 2010 मध्ये एनडीटीव्हीच्या व्यवसाय प्रवर्तक आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेडला 403.85 कोटी रुपये कर्ज दिले होते. त्याऐवजी, एनडीटीव्हीमधील 29.18 टक्के भागभांडवल कर्जदाराकडून कधीही घेण्याची तरतूद करण्यात आली होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.