बिहार पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान जन सुराज पार्टीचे संयोजक आणि सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी मंगळवारी बेलागंज येथे आयोजित प्रचार सभेत सांगितलं की, निवडणूक सल्ला देण्यासाठी ते एका नेत्याकडून तब्बल 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेत होते. ही माहिती देताना त्यांनी स्वतःच्या राजकीय यशाचं प्रमाणही स्पष्ट केलं. प्रशांत किशोर यांनी सांगितलं की, त्यांच्या रणनीतीमुळे सध्या 10 राज्यांमध्ये त्यांच्या सल्ल्याने सरकार चालत आहेत.