Prashant Kishor: 'मुस्लिमांनी राजकीय मजूर होण्याचे थांबवावे..' प्रशांत किशोर यांचा गठ्ठा मतदानावर डोळा, बिहार मध्ये करणार खेला?

Prashant Kishor Bihar Politics Muslim votes his focus प्रमुख मुस्लिम विचारवंत आणि बिहारचे माजी मंत्री मोनाजिर हसन यांच्यासह जनसुराजने पाठिंबा दिलेले आमदार अफक अहमद यांनीही यावेळी बिहारच्या राजकारणातील अल्पसंख्याकाच्या सहभागाबाबत आपली मते मांडली.
prashant kishor
prashant kishor esakal
Updated on

पाटणा, ता. १५ (पीटीआय) ः ‘जनसुराज’ या आपल्या आंदोलनाकडे सक्षम राजकीय पर्याय म्हणून बिहारमधील मुस्लिम समुदाय आकर्षित होत असल्याचा विश्वास राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला. हाज भवन येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जनसुराज आंदोलनातून राजकीय पक्ष उभा राहत असून बिहारमध्ये २०२५ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक हा पक्ष लढवेल. मुस्लिम समुदायात जनसुराजचे जोरदार स्वागत होत आहे, असेही प्रशांत किशोर यांनी सांगितले.

prashant kishor
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांना बिहारच्या नेतृत्वाचे स्वप्न; राजकीय पक्षाची करणार स्थापना

बिहारमधील मुस्लिमांमध्ये सर्वाधिक पसंतीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजदवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले, की बिहारमधील मुस्लिमांनी यापुढे कंदील चिन्हाचे इंधन होऊ नये कारण इतर लोक त्याच्या प्रकाशाचा आनंद घेतात. कंदील हे राजदचे चिन्ह असल्याचा संदर्भ त्यांच्या वक्तव्याला होता.

मुस्लिमांनी राजकीय मजूर होण्याचे थांबवावे आणि त्याऐवजी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शांवर विश्वास ठेवणाऱ्या हिंदूंना सहकार्य करत त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी मतदान करावे, असे आवाहनही किशोर यांनी केले.

prashant kishor
Prashant Kishor: 'पुढचे 20 ते 30 वर्षे भाजपचेच'; लोकसभेची चूक मान्य करताना पीकेंनी केली आणखी एक भविष्यवाणी

प्रमुख मुस्लिम विचारवंत आणि बिहारचे माजी मंत्री मोनाजिर हसन यांच्यासह जनसुराजने पाठिंबा दिलेले आमदार अफक अहमद यांनीही यावेळी बिहारच्या राजकारणातील अल्पसंख्याकाच्या सहभागाबाबत आपली मते मांडली. बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व २४३ जागांवर उमेदवार रिंगणात उतरविण्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी यापूर्वीच केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.