नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) सर्वांचे ऐकतात आणि हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. त्यांना माहित आहे की, लोकांना काहीतरी हवे आहे. येत्या काही दशकांत देशातील राजकारण भाजपभोवतीच फिरणार आहे, असे मत भारतातील निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर यांनी मोदींचे कौतुक करताना केले आहे. (Prashant Kishor Comment on PM Modi)
काँग्रेसवर निशाणा साधतांना ते म्हणाले की, काँग्रेसशिवायही देशात मजबूत विरोधी पक्ष उभा करणे शक्य आहे. (Prashant Kishor Targeted congress & Rahul Gandhi ) यासोबतच काँग्रेसला वाचवायचे असेल तर गांधी घराण्याशिवाय कोणत्याही नेत्याला पक्षाध्यक्ष करणे आवश्यक आहे. राहुल गांधींबाबत बोलताना ते म्हणाले की, तुम्ही फक्त ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून भाजपचा पराभव करू शकत नाही.
ममतांच्या मोहिमेला समर्थन
प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगालच्या (West Bangal Chief Minister Mamata Banerjee) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला मुंबईत यूपीएच्या विधानाला नकार दिल्याचे समर्थन करत, सर्वात जुन्या पक्षाशिवायही देशात भाजपविरोधी आघाडी तयार केली जाऊ शकते असे वक्तव्य केले आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी देशात यूपीए नसल्याचे वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी तिसरी आघाडी निर्माण करण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी काँग्रेसशिवाय तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या ममता बॅनर्जींच्या मोहिमेचे समर्थन केले आहे.
2024 सार्वत्रिक निवडणुकीवर केले भाष्य
प्रशांत किशोर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या विरोधात जोरदार विरोध करण्याच्या रणनीतीवर चर्चा केली. काँग्रेसवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काँग्रेसला एकाही लोकसभा निवडणुकीत स्वबळावर एकही जागा मिळालेली नाही. गेल्या 10 वर्षांच्या निवडणुकीत काँग्रेसला 90 टक्के निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची जबाबदारी काँग्रेस नेतृत्वाने घ्यावी असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.