Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्याकडून अधिकृतरीत्या जनसुराज्य या राजकीय पक्षाचे लाँचिंग; पहिल्या अध्यक्षांबाबत जाणून घ्या

Prashant Kishor (PK) launched Jansuraj Party: मनोज भारती हे जनसुराज्य या राजकीय पक्षाचे पहिले कार्यकारी अध्यक्ष असतील. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
Prashant Kishor
Prashant Kishor
Updated on

पाटना: राजकीय सल्लागार प्रशांत किशोर उर्फ पीके यांनी अधिकृतरीत्या जनसुराज्य पक्षाची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे बिहारच्या पाटना येथे महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी याबाबत घोषणा केली आहे. मनोज भारती हे जनसुराज्य या राजकीय पक्षाचे पहिले कार्यकारी अध्यक्ष असतील. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

प्रशांत किशोर यांनी पाटना येथे एका भव्य रॅलीचे आयोजन केले होते. यावेळ पीके यांनी मनोज भारती यांच्या नावाची कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली. मनोज भारती हे दलित समाजातून येतात. ते आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत. याशिवाय त्यांनी आयएफएस अधिकारी म्हणून पाच ते सात देशांमध्ये बिहारचे नेतृत्व केले आहे.

Prashant Kishor
Loksabha Election : भाजप ३०३ जागांचा टप्पा ओलांडेल;‘पीके’ यांचा अंदाज,लोकांत असंतोष नसल्याचा दावा

पीके यांनी गेल्या दोन वर्षांपासून जन सुराज यात्रेच्या माध्यमातून बिहारमध्ये वातावरण निर्मिती केली आहे. त्यांनी या दोन वर्षात बिहारमधील प्रत्येक शहर आणि गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. आता विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी नशीब आजमावण्याचं ठरवलं आहे. त्याच दृष्टीने त्यांनी आज राजकीय पक्षाची अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.

Prashant Kishor
Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

प्रशांत किशोर यावेळी म्हणाले की, तुम्हा सर्वांना मोठ्या आवाजात जय बिहार म्हणायचं आहे. तुम्हा सर्वांना इतक्या मोठ्याने म्हणायचं आहे की कोणी तुम्हाला बिहारी म्हणणार नाही आणि ही एक शिवी वाटणार नाही. तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचायला पाहिजे. तुमचा आवाज पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मुंबईपर्यंत पोहोचायला हवा. याच ठिकाणी तुमच्या बिहारी मुलांसोबत गैरवर्तन झालं, त्यांना मारहाण करण्यात आली.

पीके पुढे म्हणाले की, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जन सुराज अभियान सुरु आहे. लोक विचारत होते की तुम्ही पक्ष कधी स्थापन करणार? देवाचे आभार मानायला हवे कारण, आज निवडणूक आयोगाने अधिकृतरीत्या जन सुराज पक्षाला मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.