Bihar Politics : भाजप, काँग्रेस हे पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार... प्रशांत किशोर यांचा घणाघात; नितीश कुमारांवरही साधला निशाणा

Prashant Kishor on Congress And BJP : गांधी जयंतीपासून बिहारच्या भूमीतून नव्या राजकारणाची सुरुवात होणार असल्याचा दावा करत त्यांनी ‘जन सुराज्य या आपल्या पक्षाच्या उद्दिष्टांबाबत माहिती सांगितली.
Lalu Yadav, Nitish Kumar And Prashant kishor
Lalu Yadav, Nitish Kumar And Prashant kishorEsakal
Updated on

उज्ज्वलकुमार : सकाळ न्यूज नेटवर्क

पाटणा, ता. २९ : गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आपला नवा पक्ष सुरू करणार असणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी आज बिहारच्या विध्वंसासाठी भाजप आणि काँग्रेस जबाबदार असल्याची टीका केली. त्यांनी आज पत्रकार परिषद घेत सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला.

प्रशांत किशोर म्हणाले, ‘‘भाजपने नितीश कुमार यांना आणि काँग्रेसने लालूप्रसाद यादव यांना सत्तेची सूत्रे देऊन सर्वांत मोठी चूक केली. हे दोन्ही पक्ष बिहारचे खरे गुन्हेगार आहेत. बिहारमधील भाजप संपत चालली आहे. किमान दहा लोकांना माहिती आहे, असाही नेता त्यांच्याकडे नाही. नितीशकुमार यांना उत्तम प्रशासक, नैतिक राजकारणी आणि विचारी नेता समजून आम्ही त्यांना मदत केली. त्यामुळेच आम्ही त्यांच्यासाठी ‘बिहार में बहार है, नितीश कुमार है’ असा नारा दिला होता. मात्र, नितीशकुमार यांच्याकडे प्रशासकाची क्षमता नाही. कधी ते लालूजींच्या कंदिलावर तर कधी भाजपच्या कमळाच्या फुलावर बसतात.’’

Lalu Yadav, Nitish Kumar And Prashant kishor
Ladki Bahin Yojana: खुशखबर! 'लाडकी बहीण'चा तिसरा हप्ता जमा होण्यास झाली सुरूवात; पैसे आले की नाही 'असे' करा चेक

नवे औषध ‘जन सुराज्य’

गांधी जयंतीपासून बिहारच्या भूमीतून नव्या राजकारणाची सुरुवात होणार असल्याचा दावा करत त्यांनी ‘जन सुराज्य या आपल्या पक्षाच्या उद्दिष्टांबाबत माहिती सांगितली. ते म्हणाले,‘‘लालूजी, नितीश कुमार आणि भाजप कालबाह्य औषधांसारखे झाले आहेत. हे नवे औषध वीस टक्के जरी प्रभावी ठरले, तर बिहारमधील लोक आमच्यावर विश्‍वास ठेवतील.’’ नव्या पक्षात आपण कोणतेही पद घेणार नसल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या घटनेत लोकप्रतिनिधीला माघारी बोलविण्याची तरतूद करण्यात आली आहे. पक्षाचा कोणताही लोकप्रतिनिधी चांगले काम करत नसेल, तर त्याला त्या पदावरून दूर करण्याचा पक्षाला अधिकार असेल, असे त्यांनी सांगितले.

Lalu Yadav, Nitish Kumar And Prashant kishor
रुग्णाची लाइफ सपोर्ट सिस्टीम नेमकी कधी हटणार, सरकार घेऊन येतंय नवीन मार्गदर्शक तत्वे; 'या' गोष्टींचा असणार समावेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.