काँग्रेसचा प्रस्ताव नाकारल्यानंतर पीकेंबाबत ममता बॅनर्जी विधान; म्हणाल्या...

Prashant Kishor still with Trinamool Party
Prashant Kishor still with Trinamool PartyPrashant Kishor still with Trinamool Party
Updated on

नवी दिल्ली : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांच्यासोबत तृणमूल पक्ष काम करीत राहील. प्रशांत किशोर बंगालच्या निवडणुकीत ममता यांच्या पक्षासोबत होते. यामुळे टीएमसीला मोठा विजय मिळाला होता. काँग्रेस व प्रशांत किशोर यांच्यात झालेली चर्चा निष्फळ ठरल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एनडीटीव्हीला सांगितले. (Prashant Kishor still with Trinamool Party)

काँग्रेसने प्रशांत किशोर यांना पक्षात सामील होण्याची ऑफर दिली होती. मात्र, पीके यांनी काही कारणास्तव याला नकार दिला होता. काँग्रेसच्या एका गटाने तेलंगणातील सत्ताधारी पक्ष आणि तृणमूल काँग्रेससोबत आयपीएसी यांच्यातील कराराचा हवाला दिला होता. ज्यामुळे प्रशांत किशोर यांचा काँग्रेसमध्ये समावेश करण्यात आला नाही, अशी सूत्रांनी सांगितले.

Prashant Kishor still with Trinamool Party
PM मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर; घेणार द्विपक्षीय, बहुपक्षीय बैठका

तृणमूल काँग्रेसनेही (Congress) हीच चिंता व्यक्त केली होती. परंतु, त्यांना स्पष्ट करण्यात आले होते की पक्ष त्यांच्याशी आपला संबंध कायम ठेवेल. त्यांच्या भूमिकेवरून तृणमूल काँग्रेसमध्येही मतभेद होते. परंतु, निवडणूक रणनीतीकार म्हणून ते त्यांच्याशी जोडले जातील, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या (Mamata Banerjee). बंगालच्या निवडणूक प्रचारात ममता बॅनर्जींच्या पक्षाशी जोडलेले प्रशांत किशोर गेल्या वर्षीच्या प्रचंड विजयानंतरही त्यांच्या पक्षासोबत काम करीत आहेत.

काँग्रेसने (Congress) पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रस्ताव स्वीकारल्याबद्दल अनेक महिन्यांच्या चर्चा आणि अटकळीनंतर प्रशांत किशोर यांनी सक्षम कृती गटमध्ये सामील होण्याचा पक्षाचा प्रस्ताव नाकारला. त्याचवेळी सूत्रांनी सांगितले की पीके एकतर काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सचिव किंवा उपाध्यक्ष बनू पाहत आहेत. प्रशांत किशोर (Prashant Kishor) आणि काँग्रेसच्या जवळच्या सूत्रांनी सूचित केले की त्यांनी सुचवलेल्या सुधारणांसाठी पक्ष तयार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.