Lok Sabha Election 2024: प्रशांत किशोर यांच्या 5 भविष्यवाणी; लोकसभा निकालाच्या किती जवळ जातील?

Prashant Kishor Top 5 Predictions: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत गेल्या काही महिन्यात अंदाज व्यक्त केले आहेत.
Prashant Kishor
Prashant Kishor
Updated on

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी पार पडेल. त्यानंतर सायंकाळी सहा वाजल्यापासूनच एक्झिट पोल समोर येऊ लागतील. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीबाबत गेल्या काही महिन्यात अंदाज व्यक्त केले आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत बांधलेले ५ अंदाज आपण जाणून घेऊया.

भाजपची कामगिरी कशी असेल?

भाजप २०१९ सारखी चांगली कामगिरी कायम ठेवेल, पण एकट्याच्या जिवावर भाजपला ३७० जागा मिळवता येणार नाहीत, असं प्रशांत किशोर एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ किंवा त्यापेक्षा थोड्या जास्त जागा मिळतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

Prashant Kishor
EXit Poll 2024: भारतात कधी झाली एक्झिट पोलची सुरूवात? 88 वर्षांपूर्वी 'या' देशात जगात पहिल्यांदाच घेण्यात आले होते EXIT Poll

भाजपविरोधात असंतोष नाही

भाजपविरोधात काहीशी निराशा किंवा मोदींचा प्रभाव कमी झाला असला तरी केंद्र सरकारविरोधात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष नाही. त्यामुळे लोकांचा कल भाजपकडेच असेल असं किशोर सीएनबीसी TV18 च्या मुलाखतीत म्हणाले होते.

उत्तर भारत, पश्चिम भारतावर मजबूत पकड!

बिझसेन टूडेला दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले होते की, उत्तर भारत आणि पश्चिम भारतात लोकसभेच्या जवळपास ३२५ जागा आहेत. २०१४ पासून याठिकाणी भाजपचा प्रभाव आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपची या जागांवर पकड असेल.

Prashant Kishor
Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

पूर्व आणि दक्षिण भारतामध्ये भाजपची कामगिरी

दक्षिण आणि पूर्व भारतामध्ये लोकसभेच्या जवळपास २२५ जागा आहेत. याठिकाणी भाजपच्या जागा वाढतील, असं किशोर बिझनेस टूडेच्या मुलाखती म्हणाले होते.

एकूण किती जागा मिळतील?

उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये कोणते भौतिक नुकसान झाले नाही तर भाजपला तेवढ्याच जागा मिळतील. २०१९ पेक्षा २०२४ मध्ये चित्र फारसं काही वेगळं नसेल असं ते मनी कंट्रोलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.