Lok Sabha Exit Poll: पुढच्या वेळी जेव्हा निवडणुका... एक्झिट पोल येताच प्रशांत किशोर यांचे खळबळजनक ट्विट

Prashant Kishore: इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियानुसार एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया डेली लाइव्हच्या एक्झिट पोलनेही एनडीएला 371 ते 400 जागा दिल्या आहेत.
Prashant Kishore X Post After Exit Poll 2024 Lok Sabha Election
Prashant Kishore X Post After Exit Poll 2024 Lok Sabha Election Esakal
Updated on

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सर्व सात टप्प्यांसाठी मतदान संपल्यानंतर, एक्झिट पोल (Lok Sabha Election Exit Poll 2024) च्या अंदाजावरून दिसून येत आहे की, देशात पुन्हा एकदा मोदी लाट येणार आहे. सर्व एक्झिट पोलमध्ये 4 जूननंतर देशात एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचे दिसत आहे. अनेक एक्झिट पोलमध्ये एनडीए 350 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोल समोर आल्यानंतर निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर लिहिले, "पुढच्या वेळी जेव्हा निवडणुका आणि राजकारणाचा प्रश्न येईल तेव्हा, खोटे पत्रकार, हाय-प्रोफाइल राजकारणी आणि सोशल मीडियावरील स्वयंघोषित तज्ञांच्या फालतू चर्चा आणि विश्लेषणात आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका."

Prashant Kishore X Post After Exit Poll 2024 Lok Sabha Election
मुख्यमंत्र्यांपासून माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीपर्यंत मतमोजणीपूर्वीच 'या' राज्यात BJP 10 जागांवर विजयी; वाचा, नेमका काय आहे प्रकार

उल्लेखनीय आहे की, इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियानुसार एनडीएला 400 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. इंडिया डेली लाइव्हच्या एक्झिट पोलनेही एनडीएला 371 ते 400 जागा दिल्या आहेत. तर इंडिया आघाडीला 109 ते 139 जागा मिळण्याची शक्यता आहे.

खरे तर लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने एनडीएला निवडणुकीत 400 हून अधिक जागा मिळतील असा दावा केला होता. इंडिया डेली लाइव्हचा अंदाज बरोबर असेल तर एनडीएने केलेला दावा खरा ठरेल.

Prashant Kishore X Post After Exit Poll 2024 Lok Sabha Election
Lok Sabha Election 2024 Result: 'या' मतदारसंघात जो पक्ष विजयी होतो तोच देशावर राज्य करतो; जाणून घ्या देशभरातील खास जागांची जादू

महाराष्ट्राचा एक्झिट पोल

लोकसभा निवडणुकीच्या विविध एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला 22 ते 35 जागा मिळतील, तर महाविकास आघाडीला (MVA) 15 ते 26 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्राने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात चुरशीची लढत पाहिली, त्यामुळे 4 जूनला काय निकाल लागेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.