Pratima Bhullar Maldonado : अभिमानास्पद! भारतीय वंशाची प्रतिमा न्यूयॉर्क पोलिसांच्या बनल्या कॅप्टन

तर यशाची शिडी चढू शकता.’’ वडिलांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, माझे वडील अनेक वर्षे टॅक्सी चालवित होते. ते कायम आमच्या पाठिशी राहत असे. मी पोलिस दलात येण्यापूर्वीच २००६मध्ये त्यांचे निधन झाले. ते आता हयाय असते तर त्यांना माझा खूप अभिमान वाटला असता.
Pratima Bhullar Maldonado
Pratima Bhullar Maldonadosakal
Updated on

न्यूयॉर्क - भारतीय वंशाच्या प्रतिमा भुल्लर माल्डोनाडो यांची न्यूयॉर्क पोलिस विभागात कॅप्टन या सर्वोच्चपदी नियुक्ती झाली आहे. या पदावरील त्या पहिल्या दक्षिण आशियायी महिला आहेत. न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित साऊथ रिचमंड हिल येथील १०२ वे पोलिस स्थानकाच्या माल्डोनाडो या प्रमुख आहेत.

Pratima Bhullar Maldonado
Mumbai : सर्पदंशामुळे कल्याणमधील मुलाचा मृत्यु

त्यांना गेल्या महिन्यात कॅप्टनपदी बढती देण्यात आली, असे वृत्त ‘सीबीएस न्यूज’ने सोमवारी (ता. १५) दिले होते. प्रतिमा भुल्लर- माल्डोनाडो यांचा जन्म पंजाबमध्ये झाला असून वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत त्या तेथे राहत होत्या. नंतर त्या न्यूयॉर्कमधील क्विन्स येथे स्थलांतरित झाल्या. त्यांना चार मुले आहेत. दक्षिण रिचमंड हिल येथे राहणाऱ्या शीख समुदायाची संख्या मोठी आहे.

Pratima Bhullar Maldonado
Pune : क्षेत्रीय कार्यालयाचा दणका! ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर आल्याने सोसायटीला एक लाखाचा दंड

न्यूयॉर्क पोलिस विभागातील एकूण ३३ हजार ७८७ पोलिसांपैकी १०.५ टक्के आशियायी आहेत. सीबीएस न्यूज’शी बोलताना माल्डोनाडो म्हणाल्या,‘‘मला खूप अभिमान वाटत आहे. येथे राहणारे व येणाऱ्या आशियायी लोकांना, दक्षिण आशियाई महिलांना मला सांगायचे की जर तुम्ही पुरेशी मेहनत केली

Pratima Bhullar Maldonado
Mumbai : गृहनिर्माण प्रकल्पांच्या नोंदणीतील फसवणूक टळणार; महारेराकडून नियमावली जारी

तर यशाची शिडी चढू शकता.’’ वडिलांबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, माझे वडील अनेक वर्षे टॅक्सी चालवित होते. ते कायम आमच्या पाठिशी राहत असे. मी पोलिस दलात येण्यापूर्वीच २००६मध्ये त्यांचे निधन झाले. ते आता हयाय असते तर त्यांना माझा खूप अभिमान वाटला असता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.