Praveen Nettaru Murder : ...आता एन्काउंटरच, कर्नाटकच्या मंत्र्याचे वक्तव्य

Praveen Nettaru
Praveen Nettaru
Updated on

Praveen Nettaru Murder : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एका दिवसापूर्वीच उत्तर प्रदेशच्या योगी मॉडेलचे कौतुक केले होते, आता त्यांच्या एका मंत्र्याने या प्रकरणी वादग्रस्त विधान केले आहे. मुख्यमंत्री बोम्मई सरकारचे मंत्री सी अश्वथ नारायण म्हणाले की, राज्य सरकार हे योगी सरकारच्या पाच पावले पुढे जाईल आणि गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी त्यांचे एन्काउंटर केलं जाईल. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

कर्नाटकचे मंत्री सी अश्वथ नारायण यांनी राज्यात होत असलेल्या हत्यांबाबत बोलताना म्हणाले की, काही लोकांकडून या प्रकरणाला चिथावणी देण्याचे प्रयत्न केले जात आहेत, ते कर्नाटकच्या संयमाची परीक्षा घेत आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याचेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आम्ही देखील गुन्हेगारांच्या एन्काउंटरसाठीही तयार आहोत, दरम्यान त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री अश्वथ नारायण म्हणाले, "त्यांना अटक केली जाईल, पण अशा घटना घडू नयेत ही आमच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची इच्छा आहे. त्यांच्या इच्छेनुसार कारवाई केली जाईल, गुन्हेगारांना पकडले जाईल आणि एन्काउंटरसाठी तयार केले जाईल. "आम्ही यूपीच्या पाच पावले पुढे जाऊ. आम्ही यूपीपेक्षा चांगले मॉडेल देऊ. कर्नाटक हे प्रगतीशील राज्य आणि मॉडेल राज्य आहे, आम्हाला कोणाच्या मागे जाण्याची गरज नाही."

Praveen Nettaru
आता राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा होणार 'CCTV'च्या कडक देखरेखीखाली

प्रवीण हत्येप्रकरणी आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या रोषाचा सामना करणारे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी सांगितले की, गरज पडल्यास ते जातीयवादी शक्तींविरुद्ध योगी मॉडेल देखील वापरू शकतात. मात्र नंतर त्यांनी आपले विधान बदलत असे म्हटले की, ते योगी मॉडेल किंवा कर्नाटक मॉडेल असू शकते.

Praveen Nettaru
मराठा समाजाला पुन्हा धक्का; EWS आरक्षणाचा लाभ देण्यासंदर्भातील जीआरही रद्द

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()