Chandrayaan-3:राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा; कोण काय म्हणालं? जाणून घ्या

चांद्रयान-३ची मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर देशभरातून भारतीयांना आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला शुभेच्छा दिल्या जात आहेत. इस्रोचं जगभरातून कौतुक केलं जातंय.
Chandrayaan-3:राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा; कोण काय म्हणालं? जाणून घ्या
Updated on

Chandrayaan 3 Success:चांद्रयान-३ची मोहीम यशस्वीरित्या पार पडल्यावर देशभरातून भारतीयांना आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला शुभेच्छा दिल्या. इस्रोचे जगभरातून कौतुक केलं जातंय. अशातचं , भारताच्या राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्र्यांनीही इस्रोला आणि देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की चांद्रयान मोहीम यशस्वी होत आहे, असा प्रसंग जो आयुष्यात एकदाच घडतो आणि सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटतो. त्याचबरोबर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील चांद्रयानच्या यशासाठी भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ट्वीट करत भारतीयांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की, "असे दिवस असतात जेव्हा इतिहास घडतो. आज, चांद्रयान-३ मोहिमेच्या यशस्वी चंद्र लँडिंगमुळे, आपल्या शास्त्रज्ञांनी केवळ इतिहासच नाही तर भूगोलाची कल्पना देखील पुनर्निर्मित केली आहे! हा खरोखरच एक महत्त्वाचा प्रसंग आहे, अशा प्रकारची घटना जी आयुष्यात एकदाच घडते, जी सर्व भारतीयांना अभिमानास्पद वाटते. मी ISRO आणि या मिशनमध्ये सामील असलेल्या प्रत्येकाचे अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील यशासाठी शुभेच्छा देते."

यापुढे मुर्मू म्हणाल्या की, "चांद्रयानचे यश, संपूर्ण मानवजातीसाठी एक मोठी उपलब्धी आहे, असे मला वाटते. हे दाखवते की भारताने मानवतेच्या सेवेसाठी आधुनिक विज्ञानासह आपल्या समृद्ध पारंपारिक ज्ञानाचा आधार कसा वापरला आहे."

त्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ट्वीट करत म्हणाले की, "चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगमुळे, भारताने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय जोडला आहे. 140 कोटी भारतीयांसाठी ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आणि ऐतिहासिक क्षण आहे, कारण भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा जगातील पहिला देश बनला आहे. हे यश अंतराळ तंत्रज्ञानातील भारताच्या क्षमता आणि सामर्थ्याची साक्ष आहे."

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्या कार्यालयात जल्लोष साजरा करत लाडू वाटले. चांद्रयान लँडिंगचे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्री कार्यालयात दाखवण्यात येत आले होते. देशभरातील नागरिकांनीही फटाके वाजवतं आणि पेढे वाटत आनंद साजरा केला. देशातील इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी देखील भारतीयांना शुभेच्छा दिल्या.

Chandrayaan-3:राष्ट्रपतींसह केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या देशवासियांना शुभेच्छा; कोण काय म्हणालं? जाणून घ्या
खुशखबर! CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, दोन परीक्षांमधील सर्वोत्तम गुण ग्राह्य धरले जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.