Ram Mandir Inauguration: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण

22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुक्रवारी (12 जानेवारी) निमंत्रण पत्र देण्यात आले.
Ram Mandir inauguration
Ram Mandir inauguration
Updated on

Ram Mandir inauguration: 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुक्रवारी (12 जानेवारी) निमंत्रण देण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांना हे निमंत्रण राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख राम लाल यांनी दिले आहे.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण पत्र 22 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्द करण्यात आले, असे विहिंपने म्हटले आहे. यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आनंद व्यक्त केला आणि अयोध्येला भेट देण्याची वेळ लवकरच ठरवणार असल्याचे सांगितले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना निमंत्रण-

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्यासाठी उपाध्यक्ष जगदीप धनखड  यांना आलोक कुमार आणि नृपेंद्र मिश्रा यांनी निमंत्रण दिले.

यावेळी  धनखड म्हणाले, "मी माझ्या तीन पिढ्यांसह अयोध्या धामला नक्की येईन आणि तुम्हाला भेटीची वेळ सांगेन. निमंत्रण मिळाल्याने मी भारावून गेलो आहे.

Ram Mandir inauguration
Atal Setu Innauguration: PM मोदींनी भाषण घेतलं आटोपतं अन् तडकाफडकी निघून गेले! कारण आलं समोर

धनखड म्हणाले, “आपल्या राज्यघटनेतील आवश्यक मूल्ये प्रभू रामाकडून घेण्यात आली आहेत. हे लक्षात घेऊन संविधानाच्या रचनाकारांनी प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांचे मुलभूत अधिकारांशी संबंधित कलमात चित्रण केले आहे. यावरून राम राज्यातील या अधिकारांचा अर्थ कळतो." (Latest Marathi News)

Ram Mandir inauguration
Charging Fee Issue : पुणेकरांची फसवणूक! उद्‍घाटनादिवशीच इ-कार चार्जिंग शुल्काचा घोळ उघड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.