Presidential Election : विरोधी पक्षांकडून शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न

Presidential Election
Presidential Electionesakal
Updated on
Summary

भाजपच्या विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी विरोधक आतापासूनच आपली रणनीती आखत आहेत.

नवी दिल्ली : देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची (Presidential Election) चर्चा सुरू झालीय. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर केलीय. त्यानुसार 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतिपदावर कोणता उमेदवार असावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठका सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे राष्ट्रपती व्हावे, अशीही चर्चा रंगलीय.

आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Presidential Election) विरोधी पक्ष अशा चेहऱ्याच्या शोधात आहे, ज्यावर सर्व विरोधी पक्षांचं एकमत होईल. यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे सर्वात योग्य मानले जात होते. मात्र, त्यांना संयुक्त विरोधी पक्षाचा उमेदवार होण्यात रस नाहीय. परंतु, पवारांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यानंतर डाव्या नेत्यांनीही पवारांची भेट घेतलीय. येत्या बुधवारी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या आवाहनानुसार, संभाव्य उमेदवारावर चर्चा करण्यासाठी विरोधकांची बैठक होणार असून, त्यात सर्व पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. इकडं पवारांनी नकार दिल्यानंतर विरोधक आता इतर नेत्यांच्या नावाचाही विचार करत आहेत. संभाव्य पर्याय म्हणून काही नेत्यांनी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपाळकृष्ण गांधी (Gopalkrishna Gandhi) यांच्याशीही संपर्क साधलाय.

Presidential Election
राष्ट्रपतीपदाची निवडणूक शरद पवार लढणार? काय म्हणाले NCP अध्यक्ष..

यावेळी भाजपच्या (BJP) विरोधात तगडा उमेदवार उभा करण्यासाठी विरोधक आतापासूनच आपली रणनीती आखत आहे. आतापर्यंत या शर्यतीत शरद पवारांचं नाव आघाडीवर होतं. त्यांच्या उमेदवारीला अनेक लहान-मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिल्याचं वृत्त अलीकडंच आलं होतं. पण, खुद्द शरद पवार ही निवडणूक लढवण्याच्या मनस्थितीत नाहीयत. राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळ सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत पवार म्हणाले होते की, "मी शर्यतीत नाही, मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाची उमेदवार असणार नाहीय." यानंतर तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. भेटून मन वळवण्याचा प्रयत्न केला. यानंतर डावे नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) आणि डी. राजा यांनीही पवारांची भेट घेतलीय.

Presidential Election
प्रेषित मोहम्मद-नुपूर शर्मा वाद चिघळला; अल-कायदापाठोपाठ IS ची थेट भारताला धमकी

बैठकीनंतर डी. राजा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “त्यांनी (पवार) आम्हाला सांगितलंय की मला निवडणूक लढवण्यात रस नाहीय. बुधवारी होणाऱ्या बैठकीत ते मनमोकळेपणाने बोलणार आहेत. आम्हाला इतर उमेदवारांच्या शक्यतांचा शोध घ्यावा लागेल." देशातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी पक्षांची एकजूट महत्त्वाची असल्यानं बुधवारी होणाऱ्या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं पवार यांनी डाव्या नेत्यांना सांगितलंय.

Presidential Election
Elon Musk ला मोठा धक्का; 'टेस्ला इंडिया'च्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा राजीनामा

ममता बॅनर्जी यांच्या आवाहनानुसार होणाऱ्या या बैठकीला सर्व विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत. याआधी काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे नेते ममता यांच्या या ‘एकतर्फी’ उपक्रमाच्या बाजूने नव्हते; पण ते एकत्र विरोधी पक्षाचा संदेश देण्यासाठी या बैठकीत सहभागी होतील, असं सांगण्यात येतंय. एक्सप्रेसनं टीएमसीच्या सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय की, काँग्रेस, समाजवादी पक्ष, आरजेडी, सीपीआय(एम), सीपीआय, एनसीपी, शिवसेना आणि डीएमके यांनी बुधवारच्या बैठकीत त्यांच्या सहभागाची पुष्टी केलीय. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला बैठकीला येऊ शकतात. मात्र, आम आदमी पक्षानं आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीय. दरम्यान, शरद पवारांचा नकार पाहता विरोधी पक्षनेत्यांनी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी अन्य नावांची चाचपणी सुरू केलीय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()