सत्तेची भूक खूपच धोकादायक; महाराष्ट्राच्या राजकारणावर सिन्हांचं परखड भाष्य

'एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे'
Yashwant Sinha vs Eknath Shinde
Yashwant Sinha vs Eknath Shindeesakal
Updated on
Summary

'देशाला मूक राष्ट्रपतींची गरज नाही, तर आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडणाऱ्या राष्ट्रपतींची गरज आहे.'

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीनंतर एकनाथ संभाजी शिंदे (CM Eknath Sambhaji Shinde) यांनी गुरुवारी सायंकाळी राज्याचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेतली. यावर आता राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Presidential Candidate Yashwant Sinha) यांनी जोरदार निशाणा साधलाय.

यशवंत सिन्हा काल रायपूरमध्ये दाखल झाले होते. इथं त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचं (Maharashtra Politics) वर्णन 'सत्तेची धोकादायक भूक' असं केलंय. एवढंच नाही तर सिन्हांनी भारतीय जनता पक्षावरही (BJP) जोरदार हल्लाबोल केलाय. सिन्हा म्हणाले, 'आज देशभर अशांततेचं वातावरण निर्माण झालंय. एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे आणि सरकार स्वतः त्याचा प्रचार करत आहे.'

Yashwant Sinha vs Eknath Shinde
'ज्यांना स्वत:चं सरकार वाचवता आलं नाही, त्यांना महाराष्ट्रात पाठवलं'

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार सिन्हांनी रायपूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. ते पुढं म्हणाले, महाराष्ट्रात काय झालं ते तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळं आपल्या लोकशाहीचं महत्त्व वाढलं आहे का? असा सवाल त्यांनी केला. केंद्र सरकारवर (Central Government) टीका करताना सिन्हा म्हणाले, केंद्र सरकार एकात्मतेच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही, तर संघर्षाचं राजकारण करत आहे.

Yashwant Sinha vs Eknath Shinde
फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणेल : ज्योतिरादित्य सिंधिया

सिन्हा यांनी देशातील जातीय हिंसाचाराच्या अलीकडच्या घटनांवरही सविस्तर भाष्य केलंय. आज देशभर अशांततेचं वातावरण निर्माण झालंय. एक विचारधारा आहे, जी लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे आणि सरकार स्वतः त्याचा प्रचार करताना दिसत आहे. राष्ट्रपतींना अधिकार आहे, ते सरकारला सल्ला देऊ शकतात. पण, ते पंतप्रधानांचे बाहुले आहेत, त्यामुळं ते काही करू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

Yashwant Sinha vs Eknath Shinde
84 कोटींचं फसवणूक प्रकरण; उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याला CBI कडून दिलासा

देशाला मूक राष्ट्रपतींची गरज नाही, तर आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडणाऱ्या राष्ट्रपतींची गरज आहे. राष्ट्रपती कार्यालय हे अत्यंत प्रतिष्ठेचं कार्यालय आहे. राष्ट्रपती पद हे सन्माननीय पद आहे. राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींची काही कर्तव्ये आहेत, ती पार पाडलीच पाहिजेत. आपण इतिहासात पाहिलं आहे की काही राष्ट्रपतींनी पदाचा आदर केला तर काहींनी मौन बाळगलं, असा घणाघातही त्यांनी केंद्रावर केलाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()