MIM चा राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हांना जाहीर पाठिंबा; ओवैसींची मोठी घोषणा

Asaduddin Owaisi Yashwant Sinha
Asaduddin Owaisi Yashwant Sinhaesakal
Updated on
Summary

विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

नवी दिल्ली : AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Presidential Election 2022) विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना पाठिंबा देण्याची घोषणा केलीय. ओवैसींनी ट्विट करून ही घोषणा केलीय.

ओवैसी म्हणाले, एआयएमआयएमचे आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करतील. ओवैसींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'एआयएमआयएमचे आमदार राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना मतदान करतील. याआधीही यशवंत सिन्हा माझ्याशी फोनवर बोलले होते. 21 जून रोजी विरोधी पक्षाच्या एका मोठ्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी यशवंत सिन्हा यांच्या नावाची संयुक्तपणे घोषणा करण्यात आली होती.'

Asaduddin Owaisi Yashwant Sinha
महाराष्ट्रात लवकरच भाजप-सेनेचं सरकार; दीपक केसरकरांनी व्यक्त केला विश्वास

यशवंत सिन्हांना 'टीआरएस'चाही पाठिंबा

दरम्यान, उमेदवार बनवल्यापासून यशवंत सिन्हा यांनी पाठिंब्यासाठी अनेक पक्षांशी चर्चा सुरू केलीय. यापूर्वी सोमवारी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या नेतृत्वाखालील तेलंगणा राष्ट्र समितीनं (TRS) त्यांना पाठिंबा जाहीर केला होता.

Asaduddin Owaisi Yashwant Sinha
गुप्तधन प्रकरण: सांगलीत सामूहिक आत्महत्या नाही तर 9 जणांची हत्या

यशवंत सिन्हा यांनी अर्ज दाखल केला

विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेदवार यशवंत सिन्हा म्हणाले, राष्ट्रपती भवनात केवळ अशा व्यक्तीनंच जावं, जो या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल, असं त्यांनी नमूद केलं होतं.

द्रौपदी मुर्मू एनडीएनच्या उमेदवार आहेत

एकीकडं विरोधकांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार बनवण्यात आलंय, तर दुसरीकडं एनडीएनं झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना उमेदवार म्हणून घोषित केलंय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()