द्रौपदी मुर्मू की, यशवंत सिन्हा; देशाचे पुढील राष्ट्रपती कोण? आज मतमोजणी

सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
द्रौपदी मुर्मू की, यशवंत सिन्हा; देशाचे पुढील राष्ट्रपती कोण? आज मतमोजणी
Updated on

Presidential Election 2022 : आज देशाला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी मतदान झाल्यानंतर गुरुवारी म्हणजेच आज 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता संसद भवनात मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी होण्याची अपेक्षा आहे. जर द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत जिंकल्या तर, त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील. 15 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 21 जुलै रोजी प्रतिभा पाटील यांच्या रूपाने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. त्यानंतर 25 जुलै 2007 रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.

द्रौपदी मुर्मू की, यशवंत सिन्हा; देशाचे पुढील राष्ट्रपती कोण? आज मतमोजणी
शिंदे सरकार लवकरच करणार 100 दिवसांच्या संकल्पपत्राची घोषणा

पहिल्या महिला राष्ट्रपती

प्रतिभा देवीसिंह पाटील देशाच्या 12व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी 2007-2012 मध्ये या पदावर काम केले. देशातील हे सर्वोच्च घटनात्मक पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर आता एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या निवडणुकीत विजयी झाल्यास त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनतील तसेच पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारतील

द्रौपदी मुर्मू की, यशवंत सिन्हा; देशाचे पुढील राष्ट्रपती कोण? आज मतमोजणी
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आज ईडीसमोर

देशाचे विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार असून, नवे राष्ट्रपती 25 जुलै रोजी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान पार पडल्यानंतर सर्व राज्यांतील मतपत्रिका संसद भवनात आणण्यात आल्या असून, संसदेच्या ६३ क्रमांकाच्या खोलीत मतमोजणी पार पडणार आहे.

द्रौपदी मुर्मू की, यशवंत सिन्हा; देशाचे पुढील राष्ट्रपती कोण? आज मतमोजणी
गुटखा बंदीला दहा वर्षे पूर्ण! बंदीनंतरही विक्री 'ओक्के' मध्येच

९९ टक्क्यांहून अधिक मतदान

संसद, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे सदस्य आणि नामनिर्देशित खासदार वगळता सर्व राज्यांच्या विधानसभांचे सदस्य राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करतात. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत 776 खासदार आणि 4,033 निवडून आलेल्या आमदारांसह एकूण 4,809 मतदार मतदानासाठी पात्र होते. नामनिर्देशित खासदार आणि आमदार आणि विधान परिषदेचे सदस्य यामध्ये मतदान करू शकत नाहीत.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, पार या निवडणुकीत मतदानादरम्यान 99 टक्क्यांहून अधिक मतदारांनी मतदान केले. कोविंद यांनी 2017 मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक एकूण 10,69,358 पैकी 7,02,044 मते मिळवून जिंकली होती. त्यांच्या प्रतिस्पर्धी मीरा कुमार यांना केवळ 3,67,314 मते मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.