देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची चर्चा सुरू झालीय.
नवी दिल्ली : देशात सध्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची (Presidential Election) चर्चा सुरू झालीय. केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक जाहीर केलीय. त्यानुसार १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, राष्ट्रपतिपदावर कोणता उमेदवार असावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बैठका सुरू आहेत. अशातच राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देशाचे राष्ट्रपती व्हावे, अशीही चर्चा रंगलीय.
युपीएकडून (UPA) राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचं नाव निश्चित झालं तर आमचं समर्थन असणार, असं वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी केलंय. तर दुसरीकडं काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी सुद्धा शरद पवारांचं नाव सुचवलं असल्याचं समोर आलंय. मात्र, आता खुद्द शरद पवार यांनीच राष्ट्रपदी पदाच्या उमेदवारीबाबत भाष्य केलंय. आपण राष्ट्रपती पदाच्या स्पर्धेत नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलंय.
राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर, शरद पवार यांच्या नावाची दिल्लीत जोरदार चर्चा सुरुय. यादरम्यान मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलंय. 'मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाहीय,' असं पवारांनी कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं असल्याची माहिती आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, आता शरद पवारांनी आपण या स्पर्धेत नाहीय, असं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार विरोधकांमध्ये चर्चा व्हावी यासाठी पुढाकार घेणार असून दुसरीकडं राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केलीय. येत्या 15 जून रोजी विरोधकांची दिल्लीत बैठक होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसनं पसंती दर्शवलीय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.