टाटांना सॅल्यूट! सामाजिक बंधने झुगारुन LGBTQIA+ समुदायाला देखील नोकऱ्यांमध्ये करुन घेतलं सहभागी

LGBTQIA+ समुदायातील लोकांच्या हक्काची चर्चा समाजात होत असली तरी या सर्व सामाजिक बंधनांच्या पलीकडे कॉर्पोरेट क्षेत्र काम करत आहे.
Tatas to Flipkart providing jobs to the LGBTQIA+ community
Tatas to Flipkart providing jobs to the LGBTQIA+ communitySakal
Updated on

Pride Month Special: भारतीय समाजात अजूनही LGBTQIA+ समुदायातील लोकांना स्वीकारण्यास लोक कचरतात. LGBTQIA+ समुदायातील लोकांच्या हक्काची चर्चा समाजात होत असली तरी या सर्व सामाजिक बंधनांच्या पलीकडे कॉर्पोरेट क्षेत्र काम करत आहे.

कॉर्पोरेट क्षेत्र केवळ LGBTQIA+ समुदायातील लोकांना आपल्या कामाच्या जागेचा एक भाग बनवत नाही, तर या समुदायातील लोकांना अनेक नोकऱ्याही देत ​​आहे.

Capemini, Axis Bank, NatWest Group, Flipkart, Schneider Electric आणि Tata Steel सारख्या भारतात कार्यरत असलेल्या कंपन्यांनी LGBTQIA+ समुदायातील लोकांना रोजगार देण्यासाठी फक्त धोरणे बनवली नाहीत तर कंपनीच्या कार्यशक्तीचा एक भाग देखील बनवत आहेत. (Tatas to Flipkart providing jobs to the LGBTQIA+ community)

जगभरातील LGBTQIA+ समुदाय जून महिना 'प्राइड मंथ' म्हणून साजरा करतात. भारतातील कॉर्पोरेट जग केवळ LGBTQIA+ समुदायातील लोकांना नोकऱ्या देत नाही. त्याऐवजी या समुदायातील लोकांना प्रशिक्षण देऊन LGBTQIA+ टॅलेंट तयार करत आहे.

The Economic Timesच्या अहवालानुसार कॅपेमिनीच्या वरिष्ठ संचालक श्रेया घोष ओबेरॉय म्हणतात की, कंपनीमध्ये चांगले टॅलेंट नियुक्त करण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी, एक चांगली संस्कृती निर्माण करणे आवश्यक आहे, जिथे सर्व प्रकारची विविधता असली पाहिजे.

त्यांनी सांगितले की, कंपनीने LGBTQIA+ समुदायाचा समावेश करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. उदाहरणार्थ, कंपनी लिंग बदलाच्या शस्त्रक्रियेसाठी 30 दिवसांची रजा देते.

कंपनीने आउटफ्रंट कमिटी देखील स्थापन केली आहे जी संवाद साधण्यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रम आयोजित करते.

(Pride Month Special From Tatas to Flipkart, corporate companies are breaking social barriers and providing jobs to the LGBTQIA+ community)

Tatas to Flipkart providing jobs to the LGBTQIA+ community
Ratan Tata: 1,800 कोटींची कंपनी फक्त 90 कोटींना विकली, रतन टाटांचही बिघडलं गणित

कॉर्पोरेट कंपन्या हे फक्त LGBTQIA+ समुदायाला नोकऱ्या देत नाही तर कार्यालयीन धोरण आणि कामाच्या ठिकाणामध्ये समाजातील लोकांना सामावून घेता येईल अशा पद्धतीने बदल करत आहे.

तसेच सर्वसमावेशक विमा संरक्षण ऑफर करणे, LGBTQIA+ जॉब फेअर, भागीदार एजन्सीद्वारे नोकर्‍या ऑफर करत आहे.

याशिवाय कार्यालयीन कर्मचाऱ्यांना लिंगसंवेदनशील बनवण्याकडे लक्ष दिले जात आहे. LGBTQIA+ समुदायासाठी कामाच्या ठिकाणी शौचालये आणि चेंजिंग रूम बनवले जात आहेत.

Axis Bank Pride 365 प्रोग्राम चालवते. त्याद्वारे 2021 मध्ये LGBTQIA+ कर्मचार्‍यांची संख्या 13 होती, जी आता 423 झाली आहे. (LGBTQIA+ community job)

त्याचप्रमाणे नॅटवेस्ट ग्रुपने 'ऑल इंक्लूसिव मेंटरिंग प्रोग्राम' तयार केला आहे. टाटा स्टीलने 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीत LGBTQIA+ समुदायातील सुमारे 100 लोकांना नोकऱ्या देऊ केल्या आहेत.

Tatas to Flipkart providing jobs to the LGBTQIA+ community
Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()