पंतप्रधान महाशय, सभागृहात या, आमचं म्हणणं ऐकून घ्या!

पंतप्रधान महाशय, सभागृहात या, आमचं म्हणणं ऐकून घ्या!
Updated on

नवी दिल्ली : संसदेचे अधिवेशन संपण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात यावे व विरोधी पक्षांचे म्हणणे एकदा ऐकून घ्यावे, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी केली आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपण्यासाठी आता आठवड्याचा कालावधी आहे. या अधिवेशनात यापूर्वीचे सर्व दिवस गोंधळामुळे वाया गेले आहेत. पेगॅससच्या मुद्द्यावरून झालेल्या गोंधळामुळे लोकसभा व राज्यसभेचे कामकाज होऊ शकलेले नाही. या पार्श्वभूमीवर तृणमूलचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी तीन मिनिटांचा व्हिडिओ तयार केला आहे व तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. `मिस्टर मोदी, कम लिसन टू अस`, असे त्याला शीर्षक दिले आहे. या संसद अधिवेशनाच्या आतापर्यंतच्या काळात पंतप्रधान मोदी केवळ एकदाच सभागृहात आले होते. नव्या मंत्र्यांची ओळख करून देण्यासाठी ते सभागृहात आले होते. त्यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे मोदींना मंत्र्यांची ओळख करून देता आली नव्हती. त्यामुळे नव्या मंत्र्यांची ओळख झाल्याचे समजण्यात यावे, असे त्यांनी सभागृहात म्हटले होते.

पंतप्रधान महाशय, सभागृहात या, आमचं म्हणणं ऐकून घ्या!
लोकल, मराठा आरक्षण, पूरपरिस्थिती; उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

पेगॅसस या स्पॉफ्टवेअरद्वारे हेरगिरी करण्यात आल्याचा मुद्द्यावरून १९ जुलैपासून दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालू शकलेले नाही. राजकीय नते, पत्रकार, सरकारी अधिकारी, माजी निवडणूक आयुक्त, माजी न्यायाधीश, आदींचा समावेश या सॉफ्टवेअरद्वारे लक्ष्य करण्यात आलेल्या संभाव्य यादीत होता. `द वायर` या वेबसाइटने याबाबतचे वृत्त दिले होते. एकूण ३०० जणांना लक्ष्य केल्याचा दावा `द वायर`ने केला होता. काही फोनचे हॅकिंग झाल्याचे पुरावेही सापडल्याचा दावा `द वायर`ने केला होता. कोणावरही बेकायदा पद्धतीने पाळत ठेवण्यात आल्याचा केंद्र सरकारने सभागृहात सादर केलेल्या निवेदनाद्वारे इन्कार केला आहे. मात्र या प्रकरणी चर्चेची मागणी केंद्राने सातत्याने फेटाळली आहे.

पंतप्रधान महाशय, सभागृहात या, आमचं म्हणणं ऐकून घ्या!
प्लॅस्टिकच्या ध्वजाचा वापर नको; केंद्र सरकारची महत्त्वाची सुचना

विरोधी पक्षांनी एकत्रितपणे प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जून खर्गे यांनी काँग्रेसची बाजू मांडली आहे. ``गेल्या १४ दिवसांपासून आम्ही या प्रकरणी चर्चेची मागणी करत आहोत. त्याला परवानगी देण्यात येत नाहीये. तुम्ही इतर विधेयके मंजूर करून घेत आहात. तुमच्यात हिम्मत असेल तर चर्चा करा,`` असे खर्गे यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. द्रमुक आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. सर्वसाधारणपणे पंतप्रधान दर गुरुवारी सभागृहात येतात. त्यादिवशी त्यांच्याकडील खात्यांसंबंधी प्रश्न उपस्थित केले जातात. संसद अधिवेशनाच्या काळात ते संसदभवन परिसरातील आपल्या कार्यालयात दररोज उपस्थित असतात, तसेच सकाळी दहा वाजता आपल्या वरिष्ठ मंत्र्यांशी दिवसभराच्या स्ट्रॅटेजीबाबत चर्चाही करतात. परंतु, ते यावेळी सभागृहात आले नसल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

पंतप्रधान महाशय, सभागृहात या, आमचं म्हणणं ऐकून घ्या!
भारताचा प्रत्येक खेळाडू हा विजेता; PM मोदींकडून जपानचंही कौतुक

कोण काय म्हणालं?

`` पेगॅसस सारख्या कंपन्यांना भारतात आणून सरकार लोकांवर पाळत ठेवत आहे आणि लोकांचे म्हणणे मात्र ऐकत नाहीये. हे लाजीरवाणे आहे,``

- वंदना चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

पेगॅसस आता प्रत्येकाच्या घरात पोहोचले आहे. आपण यामुद्द्यावर चर्चा केलीच पाहिजे.

- मनोज झा, राष्ट्रीय जनता दल

दिल्लीत दलित मुलीवर बलात्कार करण्यात आला व तिला जाळण्यात आले. त्याबाबत अवाक्षरही काढत नाही.

- सुशीलकुमार गुप्ता, आम आदमी पार्टी

माझा मायक्रोफोन बंद करण्यात आला नाही, तर मी शेतकऱ्यांच्या विषयावर बोलेन.

- दीपिंदरसिंह हुडा, काँग्रेस

संसदेमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे.

- सुखेंदू शेखर रॉय, तृणमूल काँग्रेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()