कझान: ‘‘ रशिया-युक्रेन संघर्षावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढायला हवा. याबाबत भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे,’’ अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना दिली. येथे सोळाव्या ‘ब्रिक्स’ संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या पंतप्रधानांनी पुतीन यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. मागील तीन महिन्यांतील हा आपला दुसरा रशिया दौरा असून, यातून दोन्ही देशांतील दृढ संबंध आणि समन्वय दिसून येतो, असे त्यांनी नमूद केले.