Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

Modi controversial infiltrator remark: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घुसखोर आणि जास्त मुलांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
pm modi
pm modi
Updated on

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घुसखोर आणि जास्त मुलांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यावर स्पष्टपणे बोलले आहेत. ज्या दिवशी मी हिंदू-मुस्लीम करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनातून संन्यास घेईन, असं ते म्हणालेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'विरोधक याचा असा अर्थ काढत आहेत हे ऐकून मला धक्का बसला. तुम्हाला कोण सांगितलं मुस्लिमांनाच फक्त जास्त मुलं असतात? मुस्लिमांसोबत हा अन्याय का? गरीब कुटुंबामध्ये देखील जास्त मुलं असतात. मी हिंदू किंवा मुस्लीम असं म्हटलं नाही'

pm modi
Loksabha Election: लोकसभा निवडणुकीत शेअर बाजारात गोंधळ; 2014 आणि 2019मध्ये कशी होती मार्केटची स्थिती?

अनेक पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवता येत नाही. माझं म्हणणं आहे तुम्हाला जितके मुलं आहेत त्यांच्या सर्वांचे पालनपोषण करण्याची क्षमता ठेवा. सरकारला हस्तक्षेप करावा लागेल आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल अशी स्थिती निर्माण करु नका. मला वाटतं देशातील लोक मला मतदान करतील. मी ज्या दिवशी हिंदू मुस्लीम करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनासाठी योग्य नसेन. मी हिंदू-मुस्लीम करणार नाही. असा माझा संकल्प आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

pm modi
Kalyan Loksabha : कल्याण लोकसभा 2014 ची झाली त्यांना आठवण;वेळ बदलते, वेळेनुसार आपण चालतो,श्रीकांत शिंदे

पंतप्रधान मोदी यांनी एका सभेत बोलताना मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. काँग्रेसचा छुपा अजेंडा आहे. काँग्रेस सत्तेत आली तर तुमची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटली जाईल. एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण कमी करून ते मुस्लिमांना दिले जाईल, असं ते म्हणाले होते.

पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा देखील दाखला दिला होता. देशातील संपत्ती अल्पसंख्यांकांना दिली जाईल. काँग्रेस तुमचे मंगळसूत्र हिसकावेल आणि ते घुसखोरांना देईल, असं मोदी म्हणाले होते. पंतप्रधान मोदी यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला होता. मोदींच्या या स्पष्टीकरणानंतर या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.